रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 05:19 PM2021-06-22T17:19:20+5:302021-06-22T17:20:03+5:30

सुरगाणा : येथील होळी चौक ते अपना बेकरी दरम्यान कॉ॑क्रिट रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाच्या वतीने याच रस्त्यावर भर पावसात उपोषण करण्यात आले.

Fasting on the street for road work | रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर उपोषण

भर पावसात रस्त्यावर बसून आंदोलन करताना सचिन महाले. समवेत रमेश थोरात, डॉ. विनोद महाले, भावडू चौधरी, बाळकृष्ण सुर्यवंशी, दिनकर पिंगळे आदी.

Next
ठळक मुद्दे पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही ह्या कॉ॑क्रिट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.

सुरगाणा : येथील होळी चौक ते अपना बेकरी दरम्यान कॉ॑क्रिट रस्त्याचे काम गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाच्या वतीने याच रस्त्यावर भर पावसात उपोषण करण्यात आले.

मागील पाच सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम ज्या संथगतीने सुरू झाले होते त्यापेक्षा अधिक गतीने हे काम बंद पडले होते. पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही ह्या कॉ॑क्रिट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.
सुरवातीला जे काही काम करण्यात आले ते इस्टीमेट प्रमाणे करण्यात आले नव्हते. शहरात जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने सदर रस्ता इस्टीमेट प्रमाणे व लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती.

मात्र संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. या कारणास्तव मंगळवारी (दि.२२) याच रस्त्यावर उपोषणाला बसण्याचा भाजपा युवा मार्र्चाचे तालुकाध्यक्ष सचिन महाले यांच्या नेतृत्वाखाली इशारा दिला होता.
यादरम्यान दोन दिवस आधी संध्याकाळी संबंधितांकडून जेसीबी लावून खडी पसरवून दाबण्यात आली. मात्र रस्ता पुर्ण कधी होणार याबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून रस्त्यावर बसून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, नगरसेवक रंजना लहरे, डॉ. विनोद महाले, एन.डी. गावित, बाळकृष्ण सुर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, पुजा महाले, सुरेखा कातकाडे, आरती महाले, अंजली महाले, विमल महाले, विठ्ठल गावित, मनोहर जाधव, छोटू दवंडे, बप्पी महाले, पराग चौधरी, लव मेतकर आदी सहभागी झाले होते. दुपारच्या सुमारास मुख्याधिकारी सचिन पटेल, ठेकेदार, अभियंता ताठे हे उपोषण स्थळी आले. यावेळी सचिन महाले यांनी नागरिकांच्या वतीने या कॉ॑क्रिट रस्ता संदर्भात कैफीयत मांडली. जोरदार पाऊस सुरू असूनही आंदोलन सुरू ठेवण्यात आले. यानंतर मुख्याधिकारी पटेल यांनी हा कॉ॑क्रिट रस्ता लवकरच पुर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मात्र हा रस्ता पुर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा सचिन महाले यांनी दिला आहे. या आंदोलनाला माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. आंदोलन स्थळी तहसिलदार किशोर मराठे, पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे, पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

 

Web Title: Fasting on the street for road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.