आझाद मैदानावर शिक्षकांचे साखळी उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:20 AM2019-08-28T00:20:19+5:302019-08-28T00:21:07+5:30
देवपूर : विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी गेल्या २० दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर साखळी उपोषण व अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. आत्तापर्यंत राज्यभरातून पाच हजार शिक्षकांनी यात सहभाग घेतला आहे. आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविणार असल्याचे शिक्षक कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अनुदान नाही, पगार नाही यासह अनेक समस्या घेऊन उच्च माध्यमिक कृती समितीच्या माध्यमातून मुंबई आझाद मैदान येथे विनाअनुदानित उच्च माध्यमिकचे शिक्षक साखळी उपोषण करत आहेत. गेल्या अठरा वर्षांपासून विनाअनुदानित कॉलेजला अध्ययन अध्यापन करणारे शिक्षक आज मेटाकुटीस आले आहेत. सर्व गोष्टींचे सोंग घेता येते; परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. नेहमी सरकार आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना वेगवेगळी आश्वासने देतात; पण प्रत्यक्ष जीआर मात्र काढत आहे.
आंदोलनासाठी राज्यभरातून पाच हजार शिक्षक हजर होते. मोठ्या संख्येने महिला या आंदोलनात सहभागी आहे. आंदोलनासाठी मंगेश गडाख, वैभव उगले, अनिल परदेशी, नीलेश गांगुर्डे, कर्तारसिंग ठाकूर, सोपान गडाख, रवींद्र गडाख, सचिन रानडे, माधव कथले, भूषण आहिराव, दीपक तांबे, दगडू रामसे आदी शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत.एक रुपयाही मिळाला नाहीउच्च माध्यमिक कृती समितीचे राज्याध्यक्ष तानाजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वीस दिवसांपासून मुंबई आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू आहे. आजपर्यंत २३० आंदोलने झाली; परंतु राज्यातील एकाही प्राध्यापकाला एक रुपयादेखील वेतन मिळालेले नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांत रोष निर्माण झाला आहे.