येवल्यात कृषी कायदे व इंधन दरवाढ विरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:15 AM2021-03-27T04:15:10+5:302021-03-27T04:15:10+5:30
तहसील कार्यालय आवारात काळे कृषी कायदे रद्द करा, पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करा या मागण्यांसह केंद्र सरकार विरोधी घोषणा देण्यात ...
तहसील कार्यालय आवारात काळे कृषी कायदे रद्द करा, पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करा या मागण्यांसह केंद्र सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार प्रमोद हिले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमेटी सरचिटणीस भैय्यासाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष अॅड. समीर देशमुख यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका केली.
आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, शहर कार्याध्यक्ष नानासाहेब शिंदे, बळीराम शिंदे, युवक अध्यक्ष मंगल परदेशी, तालुका कार्याध्यक्ष संदीप मोरे, राजे आबासाहेब शिंदे, विलास नागरे, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, अण्णासाहेब पवार, राजेंद्र गणोरे, शिवनाथ खोकले, कैलास घोडेराव, सुखदेव मढवई, नितीन झाल्टे आकाश घोडेराव, तेजस थोरात आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(सोबत फोटो)