गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:52+5:302021-07-24T04:10:52+5:30
ओझर : ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’, या उक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यासांना जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक ...
ओझर : ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’, या उक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यासांना जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक संस्था, शाळांमध्ये अभिवादन करण्यात आले.
लोकमान्य टिळकांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. प्रारंभी महर्षी व्यास व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष आहेर, उपमुख्याध्यापिका सुनीता नलावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी व्यास पौर्णिमेनिमित्त विद्यालयाच्या सेवकांनी मुख्याध्यापक सुभाष आहेर यांना पुष्पगुच्छ देऊन, गुरुचरणी आदरभाव व्यक्त केला.
कार्यक्रमास शरद शेजवळ, नंदकुमार न्याहारकर, भागवत गवळी, अरुण सावंत, बाळासाहेब ढेपले, परसराम शेडगे, विवेक सोनगडकर, संजय टरले, रेखा देशमाने, रूपाली जाधव, स्वाती बोरसे, मोहिनी तारू, रोहिणी चौधरी, सीमा पाटील, पूनम पाटील, कविता शिंदे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन हेमंत भट यांनी केले, तर आभार सुरेश शेटे यांनी मानले.
(२३ ओझर १)
----------------
एसपीएच विद्यालय, उमराणे
उमराणे : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित एस. पी. एच. माध्यमिक विद्यालयात युगपुरुष लोकमान्य टिळक यांची जयंती व गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. के. भामरे यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षक व्ही. एस. बस्ते, आर. डी. ठाकरे, एम. झेड. देवरे, बी. आर. देवरे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व्ही. एस. बस्ते यांनी केले, तर आभार श्रीमती एम. झेड. देवरे यांनी मानले.