सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात;बस ४०० फूट दरीत कोसळली, १ महिला ठार, बचावकार्य सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 08:56 AM2023-07-12T08:56:00+5:302023-07-12T08:56:07+5:30

सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

Fatal accident in Saptashringi Gad Ghat; Bus falls into 400 feet gorge, 1 woman killed, rescue operation underway | सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात;बस ४०० फूट दरीत कोसळली, १ महिला ठार, बचावकार्य सुरु

सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात;बस ४०० फूट दरीत कोसळली, १ महिला ठार, बचावकार्य सुरु

googlenewsNext

- मनोज देवरे

कळवण (नाशिक) सप्तशृंगी गड घाटात एस टी बसचा भीषण अपघात झाला  असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.एस टी बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट दरीत कोसळली. बसमध्ये 22 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. 

सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी 8:30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. सप्तशृंगी गडावरून खाली येत असतांना घाटात गणपती टप्प्यावरुन थेट दरीत  कोसळली त्यामुळे बसचा मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे.

सकाळी सप्तशृंगी गडावरून खामगाव ला निघालेली होती. गड उतरत असताना गणपती टप्प्यावरून बस खाली कोसळली असून तब्बल 400 फूट ती गेली आहे बसमध्ये जवळपास 22 प्रवासी असल्याचे समजते आहे. तर या अपघातात एक महिला ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनेची माहिती घेत ते सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले आहेत. या घटनेत किती लोक जखमी आहेत, किती मृत आहेत. याबाबतचा आकडा अद्याप समजू शकला नाही. मात्र बस थेट 400 फूट खाली कोसळल्याने हा मोठा अपघात असल्याचे बोलले जात आहे.

सर्व प्रवासी वणी शासकीय  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. एकूण 22 पैकी 1 मयत- आपत्कालीन उपचारासाठी रुग्ण नाशिकला शिफ्ट केलेत. 5 रुग्ण नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

Read in English

Web Title: Fatal accident in Saptashringi Gad Ghat; Bus falls into 400 feet gorge, 1 woman killed, rescue operation underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.