नाशिक पेठ रस्त्यावर एसटी बस सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात, ट्रक चालक ठार
By नामदेव भोर | Updated: June 22, 2023 18:27 IST2023-06-22T18:26:45+5:302023-06-22T18:27:44+5:30
दोन्ही वाहनाची धडकेत आठ ते दहा प्रवासी किरकोळ व मध्यम स्वरूपाची जखमी झाल्याची समजते.

नाशिक पेठ रस्त्यावर एसटी बस सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात, ट्रक चालक ठार
नाशिक : पेठ रोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानी जवळ मिक्सर ट्रक आणि राज्य महामंडळाच्या लाल परी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचा चालक बाळू एकनाथ बेंडकुळे ( ६०, रा,आशेवडी, ता. दिंडोरी) ठार झाला असून बस चालक गंभीर जखमी झाला आहे.
दोन्ही वाहनाची धडकेत आठ ते दहा प्रवासी किरकोळ व मध्यम स्वरूपाची जखमी झाल्याची समजते. पेठ व जुना आडगाव नाका येथील 108 चे ॲम्बुलन्स ने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधील प्रवासी दुसऱ्या बसने नाशिककडे पोहोचले असून, काही जखमींना बसमधूनही शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.