गिरणारे-हरसूल रस्त्यावर जीवघेणी प्रवाशी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 03:08 PM2018-09-20T15:08:16+5:302018-09-20T15:10:15+5:30
पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे
नााशिक - नााशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गिरणारे - हरसूल या ग्रामीण भागातील रस्त्यांवर रोज हजारोंच्या संख्येने खासगी वाहनातून बेकायदेशीरपणे प्रवशांची जीवघेणी वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी ग्रामीण भागात वाहतूक पोलिसांचे अस्तित्वच कुठे दिसत नाही. प्रवाशांना जनावरांप्रमाणे वाहनात कोंबून दिवसाढवळ्या सर्रास वाहतूक सुरु असल्याने या अवैध वाहतुकीला कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पश्चीम भागात प्रवाशांच्या सोईनुसार बसची सेवा नसणे, कधी तीन ते चार तास एकही बस नसणे असे प्रकार ग्रामीण भागात दरररोज घडत असल्यामुळे बसच्या गैरसोयींना वैतागलेले प्रवासी सरळ खासगी वाहतुकीकडे आपला मोर्चा वळवितात. या पट्टयात खाजगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. गुजरात सिमेवरील वाडा, पडसंन , खरशेत, ओझरखेड, भागापासून ते हरसूल, गिरणारे पट्ट्यातील गोर गरीब आदीवासी मजूर, विद्यार्थी नाशिक व गिरणारे हर्सूल या ठिकाणी रोजगार, शिक्षण, बाजार व खाजगी कामासाठी दररोज ये-जा करतात. अशा वेळी थेट टॅक्सी, जीपला मागे लटकून किंवा वर टपावर बसवून प्रवाशांची वाहतूक केली जाते. वाहनांमध्ये प्रवासी अक्षरश: कोंबून भरलेले असतात. अशा प्रकारच्या वाहनांना एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते. नंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होते. वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंधामुळेच हे सुरू असून, बºयाच खाजगी गाडयांना वाहन विमा नसल्याने, तसेच बरीच वाहने नादुरुस्त असतानाही चालविली जातात. मात्र प्रादेशिक परिवहन विभागाचे फिटनेस प्रमाणपत्र देखील कधी तपासले जात नाही. त्यामुळे कागदपत्रांची अपूर्तता असल्यास एखादा प्रवासी अपघातात दगावला तर वेळप्रसंगी त्याला विमा कंपनीकडून विमा नाकारला जातो. परंतु याची काळजी प्रवाशी वाहतूक करणाºयांना नसून, प्रवाशीही कमी पैशात प्रवास होतो म्हणून या खासगी वाहतुकीला प्राधान्य देत आहे. या भागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, एस. टी. महामंडळानेच दर अर्धातासाला गाड्यांचे नियोजन करावे अशी मागणी केली जात आहे.