आज होणार गावकारभाऱ्यांच्या नशिबाचा फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:39+5:302021-01-18T04:13:39+5:30

नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला ...

The fate of the villagers will be decided today | आज होणार गावकारभाऱ्यांच्या नशिबाचा फैसला

आज होणार गावकारभाऱ्यांच्या नशिबाचा फैसला

Next

नाशिक : जिल्ह्यातील ५६५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर सोमवारी (दि.१८) त्यांच्या नशिबाचा फैसला होणार आहे.

ज्या तालुक्यांमध्ये निवडणूक झाली अशा १३ तालुक्यांमध्ये सकाळी १० वाजेपातून मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असून दुपारपर्यंत बहुतेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती येणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यापैकी ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ५६५ ग्रामपंचायतीसाठी गेल्या शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये ११ हजार ५६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. ५६५ ग्रामपंचायतींच्या ४२२९ जागांसाठी जिल्ह्यातील ८ लाख ८० हजार ६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ८०.३६ इतकी झाली. जिल्ह्यात सर्वत्र मतदारांचा प्रचंड उत्साह असल्याने निकालाची उत्कंठा वाढली आहे. ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या तालुक्यांमध्ये १०,९५,९७३ इतक्या मतदारांची नोंद झाली होती. त्यापैकी ८,८०,०६२ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४,०९,४१२ महिला, तर ४,७०,६४९ पुरुष मतदारांचा समावेश आहे.

प्रशासनाकडून मतमोजणीची सर्व तयारी करण्यात आली आहे. ज्या तालुक्यांमध्ये मतदान झाले अशा ठिकाणी तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. ग्रामपंचायतींच्या जागांनुसार जिल्ह्यात एकूण १४२ टेबलांवर ही मतमोजणी होणार असून ७४० कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहे. सिन्नरमध्ये सर्वाधिक १५७ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी ९० ग्रामपंचायतींसाठी १७०० उमेदवार नशीब अजमावत आहेत. ज्या ठिकाणी अधिक उमेदवार आहेत, अशा ठिकाणी अतिरिक्त टेबल लावण्यात आलेले आहेत. मतमोजणी केंद्रांना मंजुरी देण्यात आल्यानंतर अशा सर्व ठिकाणी मतमोजणी करण्यासाठी रविवारी संपूर्ण तयारी करण्यात आली. सर्वत्र तहसीलदार या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, मतमोजणी केंदांवर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतमोजणी केंद्र परिसरात गर्दी हेाणार नाही याबाबतची काळजी घेतली जात आहे. केवळ उमेदवार आणि त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधीस परवानगी देण्यात आलेली आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर गर्दी होणार नाही यासाठी केंद्रापासून २०० मीटरपर्यंतच्या परिसरात पोलीस बंदोबस्तदेखील वाढविण्यात आलेला आहे.

--इन्फो--

असे आहे मतमोजणी केंद्रे.

तालुका मतमोजणी केंद्रे.

नाशिक तहसील कार्यालय, नाशिक.

त्र्यंबक तहसील कार्यलय, त्र्यंबकेश्वर.

दिंडोरी शासकीय धान्य गोदाम, तहसील कार्यालय, दिंडोरी.

इगतपुरी नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यलय, इगतपुरी.

निफाड केजीडीएम महाविद्यालय, निफाड.

सिन्नर तहसील कार्यालय, सिन्नर.

येवला तहसील कार्यालय, येवला.

मालेगाव नवीन तहसील कार्यालय, मालेगाव.

नांदगाव इतर प्रशासकीय इमारत, सहतील कार्यालय, नांदगाव

चांदवड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, चांदवड.

कळवण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, मोठे सभागृह कळवण (मानूर), ता. कळवण.

बागलाण तहसील कार्यालय, बागलाण.

देवळा नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, वाजगाव रोड, तहसील कार्यालय देवळा. (मीटिंग हॉल)

Web Title: The fate of the villagers will be decided today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.