पाटोदा शिवारात आगीत शेडनेटसह चाऱ्याची गंजी खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 06:47 PM2019-04-26T18:47:50+5:302019-04-26T18:48:23+5:30
पाटोदा : पाटोदा कानडी शिवारातील शेतकरी नवनाथ नाना नाईकवाडे यांच्या शेतातील विद्युत तारांमध्ये शॉट सर्कीट होऊन लागलेल्या आगीत शेतातील सुमारे अर्धा एकरवरील शेडनेट व पाच एकरातील दहा बारा ट्रॅÑक्टर चा-याची गंजी जळून खाक झाली. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत सुमारे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले.
नाईकवाडे यांच्या शेतातून मुख्य विद्युत वाहिनी गेलेली असून या मुख्य वाहिनीच्या समांतर खालून दुसरी एक विद्यूत वाहिनी गेलेली आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास या विद्युत वाहिन्यांमध्ये शॉट सर्कीट होऊन शेडनेटला आग लागली. दुपारी वाºयाचा वेग जोरात असल्याने व शेडनेटचे कापड उन्हामुळे कडक झाल्यामुळे क्षणार्धात त्याने पेट घेतल्याने मोठा जाळ निर्माण झाला . आगीमुळे शेडनेट जवळच जनावरांसाठी रचून ठेवलेल्या चा-याच्या गंजीलाही आग लागली. या आगीमुळे शेडनेट मधील मिरचीचे पीकही होरपळून निघाले असून शेतकºयाचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागताच शेत वस्तीवरील नागरिकांनी आग विझवण्यासाठी विहिरीवरील पंपच्या साहाय्याने पाण्याचा मारा सुरु करून प्रयत्न केले .सध्या कडक उन्हाचे दिवस असून चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चारा जळून खाक झाल्याने पशुधन वाचविण्यासाठी नाईकवाडे यांना महागडा चारा खरेदी करून पशुधन जतन करावे लागणार आहे.आग विझविण्यासाठी विवेक महंत, राहुल नाईकवाडे, सोन्याबापू नाईकवाडे व मेंढपाळ बांधवांनी मदत केली.