निºहाळे फत्तेपूर पाच दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 09:21 PM2020-07-02T21:21:43+5:302020-07-02T22:55:34+5:30
निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निºहाळे-फत्तेपूर येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने गावातील सर्व दुकाने, व्यवहार पुढील पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच अण्णा काकड व पदाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊनच्या या कालावधीत कुणीही घराबाहेर पडणार नाही, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे. जेथे रुग्ण आढळले आहेत तेथे सर्व कॉरण्टाइन करण्यात आले आहे.

गावात कोरोना संसर्गामुळे एक व्यक्ती बाधित झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडून आल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना दक्षता समितीची तातडीची बैठक घेतली. सरपंच अण्णा काकड, ग्रामविकास अधिकारी एन.एम.
अहिरे, अरोग्य विभागाचे गणेश कोळसे, कामगार पोलीसपाटील शिवाजी शिंदे, संगीता काकड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास काकड, आशासेविका व अंगणवाडी सेविका यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य या बैठकीत उपस्थित होते. गावात येणाºया नाकाबंदी घालण्यात आली असून, गावातील मंदिरेही बंद करण्यात आली आहेत.