नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात पिता-पुत्र ठार
By admin | Published: February 16, 2017 10:48 PM2017-02-16T22:48:15+5:302017-02-16T22:48:28+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर अपघातात पिता-पुत्र ठार
सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर मोह शिवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास हायवा डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात राहुरी (अहमदनगर) तालुक्यातील सक्रापूर येथील पितापुत्र जागीच ठार झाले. अपघातानंतर डंपरचालक फरार झाला.
सक्रापूर (ता.राहुरी) येथील रशीद चांदभाई शेख (४०), पत्नी समिना व मुलगा परवेज (१०) हे युनिकॉन मोटारसायकलने (क्र. एमएच १७ बीआर ३०१६) नाशिककडून सिन्नरच्या दिशेने येत होते. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या हायवा डंपरने (एमएच १५ सीके ४९२२) दुचाकीला संकलेचा फार्मजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात रशीद शेख (४०) व त्यांचा मुलगा परवेज (१०) हे जागीच ठार झाले. पत्नी समिना जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी सिन्नर येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातानंतर डंपरचालक फरार झाला. मयत शेख पितापुता यांचे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. (वार्ताहर)