नगरजवळ जळगाव निंबायतीच्या पिता-पुत्राचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 10:50 PM2022-05-23T22:50:40+5:302022-05-23T22:51:22+5:30

मनमाड : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान बाजीराव त्र्यंबक मिसकर (३८) आणि त्यांचा मुलगा साई बाजीराव मिसकर (१२) रा. हनुमान नगर, मनमाड या दोघा पिता-पुत्रांचा नगरजवळ कामरगाव शिवारात अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरावर शोककळा पसरली आहे.

Father and son of Jalgaon Nimbayati die in an accident near Nagar | नगरजवळ जळगाव निंबायतीच्या पिता-पुत्राचा अपघातात मृत्यू

नगरजवळ जळगाव निंबायतीच्या पिता-पुत्राचा अपघातात मृत्यू

Next
ठळक मुद्देशोककळा : पिता सैन्य दलाचा जवान

मनमाड : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान बाजीराव त्र्यंबक मिसकर (३८) आणि त्यांचा मुलगा साई बाजीराव मिसकर (१२) रा. हनुमान नगर, मनमाड या दोघा पिता-पुत्रांचा नगरजवळ कामरगाव शिवारात अपघातीमृत्यू झाल्याच्या घटनेने शहरावर शोककळा पसरली आहे.
बाजीराव मिसकर हे भारतीय सैन्य दलात हरियाणा राज्यातील हिस्सार येथे कार्यरत होते. भावाच्या वर्षश्राद्धाकरिता ते सुट्टीवर मनमाड येथे आले होते. नुकताच त्यांच्या मेहुण्याचा विवाह झाला होता. त्यामुळे सर्व कुटुंब श्रीक्षेत्र जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि.२३) निघणार होते. मात्र बाजीराव आपल्या मुलासह स्वत:च्या अल्टो कारने रविवारी (दि.२२) रात्रीच मनमाड येथून निघाले. सोमवारी पहाटे अहमदनगर - पुणे महामार्गावर कामरगाव शिवारात असलेल्या हॉटेल सुवर्णज्योतजवळ त्यांच्या अल्टो कारला ट्रकने धडक दिली. कारचा वेग प्रचंड असल्याने या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात जवान बाजीराव मिसकर व त्यांच्या १२ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. ते मूळचे जळगाव ( निंबायती) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, भावजयी आणि एक मुलगी असा परिवार आहे.
 

Web Title: Father and son of Jalgaon Nimbayati die in an accident near Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.