लेकीच्या मृत्यूप्रकरणी पित्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:35 PM2019-11-26T22:35:08+5:302019-11-26T22:36:35+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि. २६) सात महिन्यांच्या गरोदर युवतीचा जळीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासचक्रे शीघ्र गतीने फिरविल्यानंतर पित्याच्या पापामुळेच सदर दुर्दैवी युवती गर्भवती राहिल्याचा संतापजनक आणि नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याचा उकल अद्याप झाला नसला तरी मयत युतीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पित्याला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नात्याला काळिमा फासणारी घटना : तळवाडे दिगरला गर्भवती युवतीचा जळीत मृतदेह आढळल्याने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मंगळवारी (दि. २६) सात महिन्यांच्या गरोदर युवतीचा जळीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासचक्रे शीघ्र गतीने फिरविल्यानंतर पित्याच्या पापामुळेच सदर दुर्दैवी युवती गर्भवती राहिल्याचा संतापजनक आणि नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याचा उकल अद्याप झाला नसला तरी मयत युतीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पित्याला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तळवाडे दिगर येथील जयश्री अनिल जाधव (१५) असे मयत युवतीचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरामागे मोकळ्या जागी जयश्रीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. ती ऐंशी टक्के भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. सदर संतापजनक घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी तत्काळ जयश्रीचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. जयश्रीचे मामा संभाजी बिरारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सटाणा पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.
पाच वर्षांपूर्वीच मयत जयश्रीचे मातृछत्र हरपले होते. तेव्हापासूनच जयश्री व तिचा लहान भाऊ भूषण यांना आईचे प्रेम देण्याऐवजी त्यांचा पिता अनिल रामदास जाधव याने मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता. दरम्यानच्या काळात या दोन्ही मुलांना डांबून ठेवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केले जात होते, असे जयश्रीचे मामा बिरारी यांनी सांगितले.शवविच्छेदनानंतर समोर आला प्रकारजयश्रीच्या मृतदेहाचे आज सकाळी सटाणा येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. या शवविच्छेदनात जयश्रीच्या पोटात सात महिन्याचा पुरु ष जातीचा गर्भ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून नराधम पित्याच्या अत्याचारामुळेच मुलगी गरोदर झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.लैंगिक शोषण कायद्यानुसार गुन्हा दाखलसदर घटना उघडकीस आल्यानंतर सटाणा पोलिसांनी संशयिताला तत्काळ अटक केली असून, मयत युवतीच्या मामांनी दिलेल्या तक्र ारीनुसार संशयित पित्याविरु द्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर तपासात मुलाचे जबाब आणि अन्य पुरावे मिळाल्यानंतर संबंधितावर हत्येचा वाढीव गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. जयश्रीच्या शरीराने पेट घेतल्यानंतर तिचा भाऊ भूषण अथवा शेजाऱ्यांना तिच्या किंचाळण्याचा आवाज का आला नाही त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत आज तरी प्रश्नचिन्हच आहे.