मुलीने फसवणूक केल्याची वडिलांची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:17 AM2017-09-19T00:17:42+5:302017-09-19T00:17:54+5:30
मालेगाव : विवाहित मुलीने वडिलांच्या मालकीचे राहते घर भाड्याने देणे आहे असे खोटे सांगून वडिलांच्या सह्या घेत खरेदी खत करून आपल्या नावावर करून घेतले. सेवानिवृत्तीचे चार लाखांच्या घेतलेल्या रकमेपोटी दोन लाख ५५ हजार रुपये परत न करता फसवणूक केल्याची फिर्याद छावणी पोलिसांत देण्यात आली. वसंत चिंधू पाटील (७५), रा. गिरणा स्टीलमागे, विजय कॉलनी या सेवानिवृत्त कर्मचाºयाने फिर्याद दिली. त्यांची विवाहित मुलगी कल्याणी श्रीकांत भांगे, रा. ऐरोली, नवी मुंबई यांनी फिर्यादीच्या मालकीचे राहते घर भाड्याने देण्याचे नाव करून खोटे सांगून त्यांच्या सह्या घेतल्या. उपनिबंधक कार्यालयात तिने सदर घर आपल्या नावावर करुन खरेदी खत केले. फिर्यादीची सेवानिवृत्तीची चार लाखांची रक्कम मुंबई येथे घर घेण्यासाठी उसनवार घेऊन त्यापैकी दरमहा पाच हजार असे दोन वर्षात एक लाख ४५ हजार परत केले. उर्वरित दोन लाख ५५ हजार परत केले नाही. दमदाटी करुन फिर्यादीच्या पत्नीस मारहाण करून फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.