बिल्व तीर्थात पिता-पुत्र बुडाले
By admin | Published: July 10, 2017 01:02 AM2017-07-10T01:02:20+5:302017-07-10T01:03:07+5:30
त्र्यंबकेश्वर : उताराने टर्न न बसल्याने गाडी थेट पाण्यात पडून सुरेश भिकाजी भांगरे व सूरज सुरेश भांगरे यांचा बुडून मृत्यू झाला,
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : नव्याने वाहन खरेदी केल्याने त्या आनंदात गावात सहज चक्कर मारण्यासाठी गेले असताना नीलपर्वत आखाड्यामागील रस्त्याने येत असताना उताराने टर्न न बसल्याने गाडी थेट पाण्यात पडून येथील सुरेश भिकाजी भांगरे (५४) व सूरज सुरेश भांगरे (२२) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर वाहन चालविण्यास बसलेला मोठा मुलगा विशाल सुरेश भांगरे प्रसंगावधान राखून पाण्यातच बाहेर पडून पोहत पोहत बाहेर आला.सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला. सुरेश भांगरे यांचा माहेश्वरी धर्मशाळेसमोर छोट्या हॉटेलचा व्यवसाय असुन त्यांनी नुकतीच अल्टो क्र . एमएच०४ डीबी ५१४१ ही ‘सेकंडहॅन्ड’कार खरेदी केली होती. आज गुरु पौर्णिमा निमित्ताने ते खंडेराव मंदीर, कासारबारी मार्गे सिंहस्थात तयार केलेल्या नवीन रस्त्याने जात होते. त्या रस्त्यावरील उतार वळण घेऊन डावीकडे वळविण्यात येतो. वेळीच टर्न बसला नाही तर गाडी थेट पाण्यात पडण्याची भिती असते. आणि नेमके तसेच घडले. अल्टो कारला वेळीच वळण घेता न आल्याने ती थेट पाण्यात गेली. त्यात तीनही बापलेक बसलेले होते. यातील दोघे मयत झाले तर एकाच जीव वाचला. दरम्यान वाहन काढण्यासाठी त्र्यंबक नगरपालिकेचे कर्मचारी पोलीस काही सेवाभावी कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेऊन कार पाण्याबाहेर काढली. तत्पूर्वी दोन्ही मृत देह कार पाण्यातच असतांना बाहेर काढले पण तरीही उशीर झाल्याने येथील उप जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी वासनिक यांनी तपासून जागीच मृत्यु झाल्याचे सांगीतले.