धरणे भरल्याने अनुकूल वातावरण

By Admin | Published: August 8, 2016 01:16 AM2016-08-08T01:16:07+5:302016-08-08T01:16:18+5:30

गिरीश महाजन : सरकारी निकषानुसार मिळणार पूरग्रस्तांना मदत

A favorable environment, filled with damages | धरणे भरल्याने अनुकूल वातावरण

धरणे भरल्याने अनुकूल वातावरण

googlenewsNext

नाशिक : दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रावर अखेर वरुणराजाची कृपादृष्टी झाली असून, बळीराजा सुखावला आहे. राज्यभरातील सर्वच धरणे हाउसफुल्ल झाल्याने पीक उत्पादनासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात आतापर्यंत ५० टक्के पाणी पोहचल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
समाधानकारक पावसाच्या हजेरीनंतर राज्यभरातील धरणांचा जलसाठा वाढला असून, पाण्याचे नियोजन व पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत पोहचविण्याबाबत महाजन यांनी शहरातील शासकीय विश्रामगृहावर अधिकारीवर्गाची बैठक बोलविली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, राज्यात सर्वदूर पाऊस समाधानकारक होत असताना नंदुरबार जिल्ह्याची चिंता होती; मात्र नंदुरबारमध्येही पावसाला दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पावसामुळे राज्यातील लहान-मोठी धरणे भरली आहेत.

Web Title: A favorable environment, filled with damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.