चिंचोलीच्या विद्यार्थ्यांना मनपसंत रंगाचे गणवेश
By admin | Published: June 18, 2014 11:52 PM2014-06-18T23:52:17+5:302014-06-19T00:58:30+5:30
नाशिक : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या मनपसंतीचे व गावातील अन्य खासगी इंग्रजी शाळेच्या तोडीस तोड गणवेश मिळणार आहेत.
नाशिक : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता त्यांच्या मनपसंतीचे व गावातील अन्य खासगी इंग्रजी शाळेच्या तोडीस तोड गणवेश मिळणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी त्यासाठी होकार दिला असून, लवकरच त्यासंदर्भात आदेश काढण्यात येणार आहेत.
चिंचोली येथील ग्रामस्थांचे व शिक्षकांचे शिष्टमंडळ सुखदेव
बनकर यांना भेटले. त्यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असून ती वाढविण्यासाठी पालक शिक्षक संघ तसेच ग्रामपंचायत यांनी विद्यार्थ्यांना रंगीत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ग्रामपंचायती अंतर्गत प्राथमिक शाळेच्या आवारात तसेच गावात पाच हजार वृक्षांची लागवडही करण्यात येणार आहे.
या शिष्टमंडळाला सुखदेव बनकर यांनी उच्च दर्जाचा रंगीत गणवेश शिवण्यास तोंडी होकार दर्शवितानाच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ करावी अन्य सुविधांसाठी आपण शाळेला आणखी निधी देऊ, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे तशा सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना दिल्या.(प्रतिनिधी)