ताहाराबादला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:36 PM2020-04-09T22:36:02+5:302020-04-09T23:12:10+5:30
बँकेत जमा झालेला पगार निवृत्तिवेतन आणि जनधन खात्यामध्ये जमा झालेले केंद्राचे अनुदान हा पैसा काढण्यासाठी ताहाराबादमधील देना बँकेत खातेदाराची गर्दी झाल्याने यात सोशल डिस्टन्स्ािंंगची मात्र ऐसी का तैसी झाली.
ताहाराबाद : बँकेत जमा झालेला पगार निवृत्तिवेतन आणि जनधन खात्यामध्ये जमा झालेले केंद्राचे अनुदान हा पैसा काढण्यासाठी ताहाराबादमधील देना बँकेत खातेदाराची गर्दी झाल्याने यात सोशल डिस्टन्स्ािंंगची मात्र ऐसी का तैसी झाली.
जनधन सुरक्षा बँकेत प्रत्येक खातेदाराला पाचशे रुपये जमा झाले असून खातेदारांनी बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे पैसे काढण्यासाठी तसेच हे पैसे त्वरित काढले नाही तर परत जातात ही अफवा गावात पसरल्याने येथील देना बँकेपुढे खातेदारांची मोठी झुंबड उडाली. यामुळे सोशल डिस्टन्सिंंगचा फज्जा उडाला असून विशेष म्हणजे बँकेत गर्दी होऊ नये यासाठी जनधनचा तारीखवार कार्यक्रम बँकानी जाहीर केले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत बँकेमध्ये खातेदारांनी गर्दी केली. काही खातेदारांनी पैसे काढले तर काहीनी पैसे परत जातील म्हणून भर उन्हात उभे राहून आपल्याला मिळतील की नाही याची प्रतीक्षा करताना दिसले. त्यात काही खातेदारांचे खाते अॅक्टिव्ह नाहीत, त्यांची अफवेने घालमेल होत आहे बँकेने गर्दी कमी होण्यासाठी काहीही दक्षता घेतलेली दिसत नाही. लोक मात्र गर्दी करीतच आहे.
आम्ही जनधन खात्याची रक्कम जमा केली आहे. ज्यांना मेसेज गेले त्यांना वाटप चालू असून गर्दी होऊ नये म्हणून बँकेच्या बाहेरच बॅँक मित्रांच्या साह्याने खाते क्रमांक विचारून सॅनिटायझरचा वापर करून खातेदारांना मास्क शिवाय प्रवेश देत नाही.
- जी. एल. बोरसे, शाखाधिकारी,
देना बँक, ताहाराबाद