कांदा अनुदानापासून वंचित राहण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:38 PM2019-03-28T23:38:33+5:302019-03-28T23:44:40+5:30

नायगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने फेब्रुवारीपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. सदरच्या अनुदानासाठी ३१ मार्चपर्यंत कागदपत्रे देण्याची मुदत आहे. मात्र सर्व्हर डाउनमुळे शेतकऱ्यांना सातबारा मिळत नसल्याने हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आॅनलाइनच्या जमान्यातही शेतकरी सातबाºयापासून वंचित राहत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Fear of being deprived of onion grants | कांदा अनुदानापासून वंचित राहण्याची भीती

कांदा अनुदानापासून वंचित राहण्याची भीती

Next
ठळक मुद्देनायगाव खोरे : सर्व्हर डाउनमुळे सातबारा उतारा मिळेना

नायगाव : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने फेब्रुवारीपर्यंत अनुदान जाहीर केले आहे. सदरच्या अनुदानासाठी ३१ मार्चपर्यंत कागदपत्रे देण्याची मुदत आहे. मात्र सर्व्हर डाउनमुळे शेतकऱ्यांना सातबारा मिळत नसल्याने हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आॅनलाइनच्या जमान्यातही शेतकरी सातबाºयापासून वंचित राहत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान जाहीर केले. प्रथम डिसेंबर व नंतर फेब्रुवारीपर्यंत हे अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले. या अनुदानासाठी ३१ मार्चपर्यंत संबंधित बाजार समितीत कागदपत्र जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातील सर्व्हर बंद-चालूच्या परिस्थितीमुळे शेतकºयांना सातबारा मिळणे अवघड झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना ३१ मार्चपर्यंत कागदपत्र जमा करण्याची मुदत आहे. ही मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकºयांची तलाठी कार्यालयाभोवती गर्दी वाढत आहे. मात्र सर्व्हर डाउनच्या कारणांमुळे शेतकºयांना सातबारा मिळणे कठीण झाले आहे. दिवस-दिवस कार्यालयात थांबूनही सातबारा मिळत नसल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रविवारपर्यंत (दि.३१) कागदपत्र जमा करण्याची शेवटची मुदत आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून ठप्प असलेली सर्व्हरसेवा आणखी काही काळापर्यंत बंद राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हाभरातील हजारो शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित राहणार असल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Fear of being deprived of onion grants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.