इगतपुरीत मोकाट कुत्र्यांच्या चाव्याने नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 03:16 PM2019-09-25T15:16:48+5:302019-09-25T15:17:12+5:30
इगतपुरी: शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अनेक नागरिकांना चावा घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इगतपुरी: शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून अनेक नागरिकांना चावा घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेष म्हणजे अचानक शहरात ऐवढी कुत्रे आली कशी हाच प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामीण रूग्णालयाच्या अहवालानुसार दि. १ जुलैपासून आतापर्यंत १०७ जणांना या कुत्र्यांनी चावले असून यात शालेय विद्यार्थी व महिलांचा समावेश जास्त आहे.शहरातील शिवाजी चौक, गांधी चौक, नूतन मराठी शाळा, नवा बाजार, रेल्वे स्टेशन, लोया रोड, पटेल चौक, खालची पेठ, आदी भागांसह शहरातील विविध ठिकाणी हे कुत्रे कळपाने राहत असून नागरिकांसह शालेय विद्यार्थी व महिलांना चावले असून विद्यार्थी व महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांनी खासगी डॉक्टरांकडे लसीकरण केले आहे. या मोकाट कुत्र्यांचे लसीकरण व निर्बीजीकरण नगरपालिका प्रशासनाने त्वरित करावी व एवढे कुत्रे शहरात येतात कुठून याचाही शोध घ्यावा व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.