जीर्ण विद्युत खांब कोसळण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 08:59 PM2021-05-18T20:59:29+5:302021-05-19T00:44:44+5:30
खर्डे : येथील ११ केव्ही लाईनवरील जीर्ण विद्युत खांब सद्याच्या वादळ वाऱ्याने कोसळून जीवित हानी होण्याची भीती वक्क्त केली जात आहे. विशेष म्हणजे या करीता गेल्या तीन वर्षांपासून विज वितरण कंपनीकडे पाठपुरावा केला जात आहे.

खर्डे येथील शेतकरी बाळासाहेब मोरे यांच्या घरालगत असलेल्या हनुमंत पाडा फिडरवरील ११ केव्ही विद्युत वाहिनीचा खांब जीर्ण झाला आहे. मोरे यांनी वीज वितरण कंपनीच्या देवळा येथील उपविभागीय कार्यालयाकडे २०१८ मध्ये या जीर्ण खांबाबाबत तक्रार करून बदलण्याची मागणी केली होती. मात्र अद्याप याची दखल घेतली नाही. घराजवळ असलेला हा जीर्ण खांब सद्याच्या वादळाने पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भिती व्यक्त केली जात आहे.
गेल्या तीन वर्षांपासून याविषयी केलेल्या तक्रारीकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याची ही शोकांतिका असून, या संदर्भात मोरे यांचे चिरंजीव प्रकाश यांनी सोशल मीडियावर तक्रारी अर्ज व्हायरल केल्यानंतर प्रहारचे देवळा तालुकाध्यक्ष संजय दहिवड यांनी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता राजेश हेकडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी येत्या दोन दिवसात हा जीर्ण खांब बदलून देणार असल्याचे सांगितले.