कांदा उत्पादन घटण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 10:07 PM2020-09-12T22:07:59+5:302020-09-13T00:09:12+5:30
दिंडोरी/लखमापूर: बियाणांच्या टंचाईमुळे यंदा कांदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे.
दिंडोरी/लखमापूर: बियाणांच्या टंचाईमुळे यंदा कांदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात असून त्यामुळे बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे.
सध्या शेतकरी वर्गाला कांदा पिकं घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बियाणे व रोपे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्यात अथवा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांची मोठ्या प्रमाणावर पायपीट करावी लागत आहे. यंदा पावसाने आपला लहरीपणा दाखवत,कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडल्यामुळे कांदा पिकांचे रोपे यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याने कांदा हंगामासाठी रोपे मिळविणे अंत्यत अवघड होऊन बसले आहे.
बरीच ठिकाणे शेती पिकाची स्थिती पाऊस, वातावरणातील बदल, कोरोना ची स्थिती यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे काही पिकांची रोपे अथवा बियाने मिळविणे म्हणजे तारे वरची कसरत झाली आहे. त्यामुळे पावसाच्या लहरी पणाचा फटका कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसण्याची व उत्पन्न वाढीसाठी बसेल. अशी परिस्थिती दिंडोरी तालुक्यात निर्माण झाली आहे. कांदा लागवडीसाठी तयार करण्यात आलेली रोपे पुर्ण नष्ट झाल्याने रोपे उपलब्ध होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गासमोर रोपे टंचाई हे नवीन संकट आ वासून उभे राहिले आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उपलब्ध केलेल्या कांदा बियाने आणून, तसेच घरच्या घरी आपल्या शेतामध्ये गादी वाफा तयार करून रोपे तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु अती पावसाने बियाने व रोपे पुर्णपणे सडून केल्याने कांदा लागवडी वर त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
-लागवडी बरोबर उत्पादन खर्च देखील वाढणार ?
यंदा जर योगायोगाने बियाने व रोपे जर मिळाली तर त्यासाठी किंमत अव्वाच्या सव्वा मोजावी लागले . बियाणे व रोपे मिळवण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे कांदा उत्पादन घेण्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणावर खर्च होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग व्दिधा अवस्थेत सापडला आहे. (१२लखमापूर)
-
यंदा प्रथमच कांदा पिकांचे बियाने व रोपे मिळवण्यासाठी आम्हाला पायपीट करावी लागत आहे. यंदा ही टंचाई निर्माण झाल्याने आमच्या हातातून कांदा पिक जाते की काय. यांची भीती निर्माण झाली आहे.कारण या कांदा पिकावर आमच्या सर्व आशा असतात.त्या आशा यंदा मावळ्याची चित्र तयार झाले आहे.
-सचिन गणपत शिंदे,आडगावकर