बस-रिक्षा अपघातात अकरा ठार झाल्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 04:42 PM2020-01-28T16:42:21+5:302020-01-28T16:43:02+5:30
देवळा (नाशिक) : कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहने विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
देवळा (नाशिक) : कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहने विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात दहा ते अकरा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात मेशी फाट्याजवळील वळणरस्त्यावर वेग नियंत्रणात न आल्याने दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. या धडकेत बसने रिक्षाला फरफटत नेत असताना दोन्ही वाहने विहीरीत पडली. विहिरीत रिक्षावर बस पडल्याने रिक्षामधील सात ते आठ प्रवाशी आणि बसमधील तीन प्रवाशी जागीच ठार झाल्याचे समजते. या अपघातातील जखमींना ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रूग्णालयही सज्ज झाले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. नाशिकहून जिल्हा रूग्णालयाच्या पाच गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत.