गाजराच्या शेतीतही नुकसानीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:20 AM2018-04-16T00:20:50+5:302018-04-16T00:20:50+5:30

वणी : पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल असताना नवीन प्रयोग शेतीत करून उत्पादनाचा पर्यायी मार्ग निवडणाºया शेतकºयांना गाजराची यशस्वी लागवड करूनही भाव नसल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.

Fear of losses in Gajra's field | गाजराच्या शेतीतही नुकसानीची भीती

गाजराच्या शेतीतही नुकसानीची भीती

Next
ठळक मुद्देवणी : भाव नसल्याने प्र्रयोगशील शेतकऱ्याचे मनोबल खचले . भाडे व तत्सम खर्चही अंगावर पडला.

वणी : पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेण्याकडे कल असताना नवीन प्रयोग शेतीत करून उत्पादनाचा पर्यायी मार्ग निवडणाºया शेतकºयांना गाजराची यशस्वी लागवड करूनही भाव नसल्याने आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. दिंडोरी तालुक्यात द्राक्ष, टमाटा, ऊस अशी नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. याबरोबरच सोयाबीन, मका, गहू, भात अशी तत्सम पिकेही तुलनात्मकरीत्या घेण्यात येतात. भाजीपाला, स्ट्रॉबेरी असेही पर्याय आहेत. नवीन प्रयोग उत्पादनाच्या माध्यमातून घेण्याचा असाच निर्णय दिंडोरी तालुक्यातील राजेंद्र निखाडे या युवा शेतकºयाने घेतला. त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात गाजराची लागवड केली. डिसेंबर महिन्यात लागवड केली. लागवडीपासून उत्पादनापर्यंत २० हजार रुपये खर्च आला. एकरी १५० क्विंटल अपेक्षित उत्पादनाचे प्रमाण होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उत्पादन सुरू झाले. प्रथमत: नाशिकच्या बाजार समितीत विक्रीसाठी गाजरे पाठविली. मात्र अवघ्या दोन रु पये किलो भावाने विक्री करावी लागली. भाडे व तत्सम खर्चही अंगावर पडला. अर्धा ते एक फूट लांबीची गाजरे, किमान १५० ते १७६ ग्रॅम एका गाजराचे वजन, गाजराची खुडणी करून ती स्वच्छ पाण्याने धुवून गोण्यांमधे पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवायची अशी प्रणाली; मात्र नुकसानीला सामोरे जावे लागल्याने गुजरात राज्यातील बडोदा येथे सध्या गाजरे विक्र ीसाठी पाठविण्याचा निर्णय निखाडे यांनी घेतला. सहा ते सात रुपयांचा भाव मिळतो आहे. मात्र बारा ते पंधरा रुपये किलो भावाने विक्र ी झाली तरच गाजराची शेती फायद्याची, नाही तर नुकसानीची भीती अशी वास्तविकता असल्याची माहिती निखाडे यांनी दिली. शेतकºयांचे मनोबल खचलेनिफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा भागात गाजराचे उत्पादन घेण्यात येते. त्या ठिकाणाहून गाजरे आणून लागवड करणाºया निखाडेंना गाजराच्या शेतीने आर्थिक सुदृढता दिली नाही. त्यामुळे शेतीत नवीन प्रयोग करून वेगळे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणाºया शेतकºयांचे मनोबल खचले आहे.

 

Web Title: Fear of losses in Gajra's field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती