गोदावरी नदीपात्रात दोघेजण बुडाल्याची भीती? मनपा अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 08:21 PM2023-09-28T20:21:44+5:302023-09-28T20:23:44+5:30
बुधवारी दिवसभर पाऊस पडल्याने रात्री गोदावरी नदीला पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
पंचवटी (नाशिक): गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या गोदावरी नदीपात्रा तील गौरी पटांगण येथे गुरुवारी (दि.28) सायंकाळी गणेश विसर्जनासाठी आलेले दोघे भाविक सव्वा सात वाजेला पाण्यात बुडाल्याची चर्चा पसरल्याने पंचवटी अग्निशमन दलाच्या जवा नांनी तत्काळ पाण्यात बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू केले होते.
बुधवारी दिवसभर पाऊस पडल्याने रात्री गोदावरी नदीला पुर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गुरुवारी (दि.28) सकाळ
पासूनच पावसाने उघडीप दिल्यानंतर गणेश भक्त गणेश मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नदीकाठच्या परिसरात दाखल झाले होते. बुधवारी झालेल्या पावसाने गुरुवारच्या दिवशी दुपारपर्यंत गोदावरी नदी खळखळून वाहत होती मात्र सायंकाळच्या वेळी पूरसदृश परिस्थिती कमी झाल्याने अनेक भाविक उत्साहाच्या भरात थेट नदी पात्रात मूर्ती विसर्जनासाठी उतरत होते.
गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजेला गाडगे महाराज पुलाखाली असलेल्या गौरी पटांगण येथील नदीपात्रात दोघे गणेश भक्त गणेश मूर्ती विसर्जन करत असताना पाण्यात बुडून वाहून गेल्याची चर्चा पसरल्याने पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्यात बोट उतरवून वाहत्या पाण्यात कोणी वाहून गेले की नाही याचा शोध सुरू केला होता रात्री आठ वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होते मात्र तो पावतो अग्निशमन दलाच्या हाती काहीही न लागल्याने नदीपात्रात कोणी बुडाले की नाही याबाबतची कोणतीही स्पष्टोक्ती नव्हती मात्र दोघेजण बुडाल्याची चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.