कोरोनाबरोबर आता 'सारी' रोगाचीही भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 11:45 PM2020-09-18T23:45:58+5:302020-09-19T01:34:27+5:30

नाशिक- जिल्'ात कोरोनाचा कहर सुरू असतानाच कोरोनासारखेच लक्षणे असलेल्या 'सारी' रुग्णांची वाढती संख्या देखिल आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे. साधारणपणे 30 टक्के रुग्णांना 'सारी'च्या लक्षणे दिसू लागली असून, अशा सर्वाना ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर, देडिकेटेड हेल्थ केअर सेन्टर मध्ये दाखल करून उपचार केले जात आहेत.

Fear of 'sari' disease now with corona | कोरोनाबरोबर आता 'सारी' रोगाचीही भीती

कोरोनाबरोबर आता 'सारी' रोगाचीही भीती

googlenewsNext
ठळक मुद्देताप, दम्याचा त्रास: दिवसात शेकडो रुग्ण निदर्शनास

नाशिक- जिल्'ात कोरोनाचा कहर सुरू असतानाच कोरोनासारखेच लक्षणे असलेल्या 'सारी' रुग्णांची वाढती संख्या देखिल आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे. साधारणपणे 30 टक्के रुग्णांना 'सारी'च्या लक्षणे दिसू लागली असून, अशा सर्वाना ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर, देडिकेटेड हेल्थ केअर सेन्टर मध्ये दाखल करून उपचार केले जात आहेत.
नाशिक जिल्'ातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन रुग्ण शोध मोहीम सध्या सुरू असून, आजवर सुमारे 5 लाख, 88 हजार, 860 कुटुंबा पर्यंत आरोग्य कर्मचारी पोहचले आहेत. या शोध मोहिमेत कुटुंबातील सर्व व्यक्तीची माहिती, त्यांना असलेल्या आजाराबाबत माहिती घेताना त्याचे तापमान, पल्स तपासले जात आहे. त्यात बहुतांशी नागरिकांना बारीकसा ताप असल्याचे दिसून येत आहे. अशा नागरिकांची कोविड टेस्ट केली जात असून, त्यात रुग्ण निगेटिव्ह असल्यास, त्याच्यावर 'सारी'चे उपचार केले जात आहे. 'सारी' रुग्णांना अंगात ताप येणे, सर्दी, खोकला येणे व श्वास घ्यायला त्रास होणे ही प्रामुख्याने लक्षणे दिसतात. त्यामुळे अशा रुग्णांवर कोरोना प्रमाणेच उपचार केले जात आहेत.
जिल्'ातील 37 कोविड सेंटरलाच त्यामुळे फिवर सेन्टर म्हणुनही गणले जात असून, आजवर या सेन्टर मध्ये 29 हजार 960 तापाच्या रुग्णांवर उपचार केले गेले आहेत. सध्याचे हवामान, तापमानातील बदल पाहता जिल्'ातील ग्रामीण भागात दिवसाकाठी 300 ते 350 रुग्ण तापाचे सापडत आहेत. जिल्'ातील नाशिक तालुक्यातील संदीप फौंडेशन, देवळाली कॅन्टोन्मेंट, पिंपळगाव बसवंत, सिन्नर या ठिकाणच्या कोविड केअर सेन्टरमध्ये अधिक रुग्ण आहेत.
ाालुका निहाय तापाचे रुग्ण
बागलाण- 281, चांदवड- 4535, देवळा- 4326, दिंडोरी- 200, इगतपुरी- 2301, कळवण- 1519, मालेगाव- 1492, नांदगाव- 480, नाशिक- 7442, निफाड- 3137, पेठ- 183, सिन्नर- 3352, सुरगाणा- 531, त्रिंबक- 963, येवला- 220

 

Web Title: Fear of 'sari' disease now with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.