येवल्यात अंनिसच्या वतीने निर्भय वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:19 AM2021-08-21T04:19:06+5:302021-08-21T04:19:06+5:30

प्राचार्य डॉ. गमे यांनी सांगितले, विचारांची लढाई विचारांनीच व्हायला हवी, पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर अजातशत्रू ...

Fearless walk on behalf of Annis in Yeola | येवल्यात अंनिसच्या वतीने निर्भय वॉक

येवल्यात अंनिसच्या वतीने निर्भय वॉक

googlenewsNext

प्राचार्य डॉ. गमे यांनी सांगितले, विचारांची लढाई विचारांनीच व्हायला हवी, पुरोगामी महाराष्ट्राच्या वैचारिक वर्तुळांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर अजातशत्रू होते. डॉ. दाभोलकर यांच्या खुनामागील सरकारी पातळीवरील मानसिकता बदलण्याची गरज आहे, ती बदलण्यासाठी पुरोगामी-परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरच उतरावे लागेल, असेही गमे यांनी या वेळी सांगितले. डॉ. दाभोलकर यांचा खून सनातनी विचारांच्या लोकांनी केला आहे. ही गोष्ट आता सर्वश्रुत झाली आहे. असे असूनही महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सरकारदेखील मारेकऱ्यांना का पाठीशी घालत आहे, असा प्रश्न राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी उपस्थित केला. राष्ट्र सेवा दलाचे रामनाथ पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी नवनाथ उंडे, कानिफनाथ मढवाई, शिवाजी साताळकर, दौलत वाणी, अप्पासाहेब शिंदे, रावसाहेब उशीर, चांगदेव मुंडे, एस. एस. बहिरम, बाबासाहेब कोकाटे, राजेंद्र बारे, हिरामण पगार, रामदास भवर, भाऊसाहेब पुरकर, हेमंत पाटील, संदीप शेजवळ, बाबासाहेब शिंदे, ऋषिकेश गायकवाड, राजेंद्र दराडे, विश्वास जाधव आदी विविध पुरोगामी विचारांच्या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

इन्फो

निर्भय बनतो, नेक बनो...!

प्रारंभी शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक, साहित्यिक नानासाहेब कुऱ्हाडे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून निर्भय मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली. हम सब दाभोलकर, भारतीय संविधानाचा विजय असो, निर्भय बनतो, नेक बनो अशा घोषणा सहभागी कार्यकर्ते देत होते. या वेळी झालेल्या सभेत पंडित मढवाई, उत्तम बंड, प्रा. डॉ. अजय विभांडिक, दिनकर दाणे आदींची समयोचित भाषणे झाली.

फोटो- २० निर्भय वॉक

येवला येथे निर्भय वॉकनंतर आयोजित सभेप्रसंगी उपस्थित डॉ. भाऊसाहेब गमे, अर्जुन कोकाटे यांच्यासह मान्यवर.

200821\20nsk_29_20082021_13.jpg

फोटो- २० निर्भय वॉक येवला येथे निर्भय वॉकनंतर आयोजित सभेप्रसंगी उपस्थित डॉ. भाऊसाहेब गमे, अर्जुन कोकाटे यांचेसह मान्यवर. 

Web Title: Fearless walk on behalf of Annis in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.