फेब्रुवारीतही धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 08:31 PM2020-02-03T20:31:48+5:302020-02-03T20:34:38+5:30

दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा दीडशे

In February, dams also have 5% water reserves | फेब्रुवारीतही धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा

फेब्रुवारीतही धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा

Next
ठळक मुद्देटंचाईचे मळभ दूर : पाणीपुरवठा योजनांना जीवदान जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५५,३९५ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एरव्ही डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईची ओरड होऊन ग्रामीण भागात टॅँकरची मागणी केली जात असताना यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा असल्यामुळे टंचाईचे संकट लांबले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्याचा जलसाठा दुपटीने असून, त्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यातही फारशी टंचाई भासण्याची शक्यता दिसत नाही.


दोन वर्षांपूर्वी जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या जिल्हावासीयांवर गेल्या पावसाळ्यात वरुण राजाने कृपादृष्टी केली. काहीसे उशिराने का होईना परंतु दमदार कोसळेल्या पावसाने आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा दीडशे टक्क्याने अधिक बरसला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरडीठाक पडलेली धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. परिणामी नद्या, नाल्यांना महापूर आला. आॅक्टोबर महिन्यात एकाच वेळी जिल्ह्यातील तेरा धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने नगर, मराठवाडा, जळगाव जिल्ह्यातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली तर नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न सुटला. दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांकडून पाण्याची मागणी केली जात, त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागत असे. यंदा मात्र फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ५५,३९५ दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ८४ टक्के जलसाठा शिल्लक असून, त्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अवघा ४२ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे मार्च ते जून महिन्यांपर्यंत पिण्याचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन जनतेला केले गेले होते. यंदा मात्र परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये असलेले पाणी व शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी अजूनही तुडुंब असल्यामुळे यंदा टॅँकरची संख्या कमी होईल, असा अंदाज पाटबंधारे खात्याच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ८२ टक्के पाणी असून, एकट्या गंगापूर धरणामध्ये ७७ टक्के जलसाठा आहे. तर दारणा धरणात ८६ टक्के जलसाठा असून, पालखेडमध्येच कमी म्हणजे ४१ टक्के पाणी आहे. ओझरखेड धरणात ८५ टक्के तर चणकापूरमध्ये ९८, हरणबारीत ८३ व गिरणा धरणात ८४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणातील पाण्यामुळे या पाण्यांवर कार्यरत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांद्वारे ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे.

Web Title: In February, dams also have 5% water reserves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.