बँकेच्या कर्जास कंटाळून शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:26 AM2021-02-06T04:26:41+5:302021-02-06T04:26:41+5:30
तालुक्यातील वांगण सुळे येथील शेतकरी माधव सखाराम टोपले ( वय ५२) यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...
तालुक्यातील वांगण सुळे येथील
शेतकरी माधव सखाराम टोपले ( वय ५२) यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
कर्जाला कंटाळून राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याची नोंद पोलीस
ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत मुलगा नीलेश टोपले यांनी ठाण्यात तक्रार दिली असून त्यात म्हटले आहे की, मी, आई मोहनाबाई, वडील माधव, भाऊ प्रकाश असे एकत्रित कुटुंबात वांगण येथे राहतो. माझ्या वडिलांनी शेतीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुरगाणा शाखेतून ट्रॅक्टरसाठी ४ लाख ५० हजार ४६७ रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतू मागील काही महिन्यांपासून शेतीत उत्पादन होत नसल्याने ट्रॅक्टरचे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे वडील नेहमी विचारात व मानसिक दडपणाखाली राहत होते. ते आम्हाला या विषयावर वारंवार बोलून दाखवत असत. तसेच भाऊ प्रकाशचे मे महिन्यात लग्न ठरले असल्याने पैशांची जमवाजमव सुरु होती. त्याच तणावात ते रहात होते. मी ४ फेब्रुवारी रोजी
कामानिमिताने बाहेरगावी गेलो होतो. आई शेतात गेली होती. प्रकाश हा नोकरी निमित्ताने बाहेरगावी होता. घरी कुणीही नसताना त्यांनी दुपारी २ वाजेच्या दरम्यान विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे राहत्या खोलीत आढळून आले. समोरच विषारी औषधाची बाटली आढळून आली होती. त्यांना नातेवाईकांच्या मदतीने
तात्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषित केले. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडबाबत बँकेने त्यांना ३० नोव्हेंबर २०२० रोजी नोटीस बजावली होती. त्यामुळे कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे, असे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर नांद्रे करीत आहेत
फोटो - ०५ माधव टोपले
मयत शेतकरी माधव सखाराम टोपले.
===Photopath===
050221\05nsk_55_05022021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ माधव टोपलेमयत शेतकरी माधव सखाराम टोपले.