उद्यापासून स्मार्ट पार्कींगासाठी मोजावे लागणार शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:29 PM2020-03-03T19:29:56+5:302020-03-03T19:32:08+5:30

नाशिक- नागरीकांच्या विरोधानंतरही शहरात रस्त्यावर स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क वसुली सुरू करण्यात येणार आहे. बुधवार (दि.४) पासून ही वसुली सुरू होणार आहे.शहरातील वाहनतळाची समस्या दुर करण्यासाठी विविध आरक्षीत भूखंड आणि खुल्या जागांचा पर्याय असताना प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्यावरच पार्कीग करणाऱ्यांकडून शुल्क वसुलीचा प्रस्ताव आखला आणि तो नगरसेवकांचा विरोध असताना मंजुर झाला आहे.

The fee to pay for smart parking starting tomorrow | उद्यापासून स्मार्ट पार्कींगासाठी मोजावे लागणार शुल्क

उद्यापासून स्मार्ट पार्कींगासाठी मोजावे लागणार शुल्क

Next
ठळक मुद्देपंधरा ठिकाणी वसुली होणारस्ट्रीट पार्कींगची १३ ठिकाणे

नाशिक- नागरीकांच्या विरोधानंतरही शहरात रस्त्यावर स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क वसुली सुरू करण्यात येणार आहे. बुधवार (दि.४) पासून ही वसुली सुरू होणार आहे.शहरातील वाहनतळाची समस्या दुर करण्यासाठी विविध आरक्षीत भूखंड आणि खुल्या जागांचा पर्याय असताना प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्यावरच पार्कीग करणाऱ्यांकडून शुल्क वसुलीचा प्रस्ताव आखला आणि तो नगरसेवकांचा विरोध असताना मंजुर झाला आहे.

सामान्यत: नागरीकांनी रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले तर वाहतूकीला अडथळा आणला असा आरोप ठेवून वाहतूक पोलीस दंड वसुल करतात. मात्र, आता स्मार्ट सिटी अंतर्गत २८ ठिकाणी आॅन स्ट्रीट पार्कींग करण्यात येणार असून त्यातील १३ ठिकाणी बुधवारपासून (दि.३) वसुली सुरू होणार आहे. दोन ठिकाणी आॅफ स्ट्रीट पार्कीग असणार आहे.

दरम्यान, सदरची पार्कींग ही तंत्रज्ञानाने युक्त असून नागरीकांना अ‍ॅपवरच पूर्व नियोजनानुसार आपल्या मोटारीसाठी जागा बुक करता येईल. तसेच आॅनलाईन पेमेंट करण्यात येणार आहे. दुचाकीसाठी पाच रूपये प्रति तास आणि चारचाकी मोटारीसाठी १० रूपये असे शुल्क असणार आहे. सुरूवातीला हे शुल्क कमी असले तरी नंतर मात्र ते वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: The fee to pay for smart parking starting tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.