पशुपक्ष्यांच्या उदरभरणाची केली सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 08:03 PM2021-03-17T20:03:18+5:302021-03-18T00:16:45+5:30
सटाणा : कोरोना या महामारीने मानव जातीचे जगणे मुश्कील केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सर्व जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या जोडीला यंदा काही महिने आधीच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्याने पशुपक्ष्यांचे पाण्याअभावी हाल होऊ लागले आहेत. यासाठी सहजसुलभ मार्ग शोधत येथील काही तरुणांनी पुढाकार घेऊन एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.

पत्र्याचे (तेलाचे डबे) वाया जाणाऱ्या डब्यांचे संकलन करून ते कापून त्यात पाणी व दाणे टाकण्यासाठी सोय करण्यात आली आहे. ज्यायोगे पशू, पक्षी आपले पोट भरू शकतात. असे तयार केलेले डबे गावातील झाडांना घराजवळ लावण्यात येऊन त्याची जबाबदारी घरात राहणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. संबंधितांनी रोज त्या डब्यात पाणी व दाणे टाकत पक्ष्यांची सोय करावी.
यासाठी कल्पेश अहिरे, शिरीष अहिरे, राकेश अहिरे, ललित जाधव, संदेश अहिरे, धीरज सोनवणे, प्रवीण सोनवणे, विश्वास अहिरे, स्वप्निल अहिरे आदींनी हा प्रयोग कृतीत आणला आहे.
आम्ही जरी छोटासा प्रयत्न केला असला तरी इतरांनी त्याचे अवलोकन करून तसा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा फायदा सगळ्यांना होईल. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घराजवळ असे डबे ठेवावेत व पशु-पक्ष्यांची सेवा करावी.
- शिरीष अहिरे, युवा कार्यकर्ता
हा उपक्रम राबविण्याने पक्ष्यांना दाणा-पाणी मिळेल आणि त्यांच्या वाढीला पोषक ठरणारी आहे.
- आश्विन अहिरे, सेवेकरी