यश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:35 AM2018-06-30T00:35:17+5:302018-06-30T00:35:30+5:30

महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह सहजीवन जगणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटप व इयत्ता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि एचआयव्ही सहजीवन जगणाºया नवविवाहित दाम्पत्याचा स्वागत समारंभ रोटरी हॉल येथे उत्साहात पार पडला.

Felicitate students on behalf of Yash Foundation | यश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

यश फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार

Next

नाशिक : महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्हीसह सहजीवन जगणाऱ्या मुलांना शालेय साहित्य वाटप व इयत्ता दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि एचआयव्ही सहजीवन जगणाºया नवविवाहित दाम्पत्याचा स्वागत समारंभ रोटरी हॉल येथे उत्साहात पार पडला.  उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीकरिता प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिंद्रा आणि महिंद्राचे कर्नल चंद्रा बॅनर्जी, सतीश बिल्डीकर, कमलाकर धोंगडे, कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी, संगीता पवार, यश फाउंडेशनचे रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्नल बॅनर्जी यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच. संघर्ष करून मिळवलेल्या गोष्टीची किंमत जास्त असते. या मुलांनी आपले आरोग्य सांभाळून बिकट परिस्थितीवर मात करून चांगले गुण मिळवून यश मिळवले आहे. त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थी, नागरिक यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: Felicitate students on behalf of Yash Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक