सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:15 AM2019-04-23T00:15:31+5:302019-04-23T00:15:47+5:30
भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार असून, या संस्कारातून सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे रविवारी (दि.२१) पेठे विद्यालयात आयोजित सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
नाशिक : भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार असून, या संस्कारातून सहजीवनाची पन्नाशी पार केलेल्या ५२ दाम्पत्यांचा लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंचतर्फे रविवारी (दि.२१) पेठे विद्यालयात आयोजित सोहळ्यात सत्कार करण्यात आला. आजी-आजोबांचा हा कौतुक सोहळा डोळ्यात साठवताना त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
ज्येष्ठ लेखिका डॉ. उषा सावंत, डॉ. प्रवीण केंगे, ब्रिजमोहन चौधरी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, मंच अध्यक्ष सुरेश विसपुते, डी. एम. कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. उषा सावंत यांनी विवाह संस्काराचे विविध पैलू उलगडून सांगताना, लिव्ह इन रिलेशनशिपमुळे ही विवाह संस्काराची परंपरा संपुष्टात येत असल्याची खंत व्यक्त केली, तसेच विवाहानंतर वय वाढते, त्यामुळे नातीगोती सांभाळून विवाह संस्काराची संकल्पना रूजवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन रमेश डहाळे यांनी केले, तर आभार विठ्ठल देवरे यांनी मानले.