खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 02:41 PM2019-06-02T14:41:07+5:302019-06-02T14:41:17+5:30
नासिक: नासिक क्रि केट अकॅडमी चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.यात हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांच्या हस्ते नासिक मध्ये विविध प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून क्रि केटपटू घडवणारे प्रशिक्षक शेखर घोष,अतुल शर्मा,संजय मराठे,अतुल गोसावी, आणि महेश झवेरीयांचा गौरव करण्यात आला.
नासिक: नासिक क्रि केट अकॅडमी चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.यात हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे
उपाध्यक्ष अॅड. अविनाश भिडे यांच्या हस्ते नासिक मध्ये विविध प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून क्रि केटपटू घडवणारे प्रशिक्षक शेखर घोष,अतुल शर्मा,संजय मराठे,अतुल गोसावी, आणि महेश झवेरीयांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी नासिक क्रि केट अकॅडमी्न कडून खेळताना पूर्ण सीझन मध्ये वेगवेगळ्या वयोगटात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूनांही गौरवण्यात आले.त्याच प्रमाणे नासिक क्रि केट अकॅडमी च्या वतीने घेण्यात आलेल्या सुनील अविनाश ट्रॉफी, समर ऋ षिकेश ट्रॉफी, आणि नासिक क्रि केट अकॅडमी्न प्रीमियर लीग या स्पर्धांचे पारितोषिक वितरणही या प्रसंगी करण्यात आले.
यंदाच्या वर्षी पासून क्र ीडा मानसोपचार तज्ञ भीष्मराज बाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ विशेष पुरस्कार नासिक क्रि केट अकॅडमीच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. मधुली कुलकर्णीयांच्या संकल्पनेतून देण्यात येणारा हा पुरस्कार नासिक मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि नासिक क्रि केट अकॅडमी चा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांच्या साठी दर वर्षी देण्यात येणार आहे.पहिल्याच वर्षी हा पुरस्कार नासिक जिमखान्याचा खेळाडू सत्यजित बच्छाव याला देण्यात आला.महाराष्ट्र कडून खेळताना रणजी स्पर्धेत त्याने यंदा भरीव कामिगरी केली आहे.मुश्ताक अली स्पर्धेत तो इंडियात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू आहे.
तसेच रणजी स्पर्धेतही त्याने या वर्षी८ सामन्यात २४ बळी मिळवले आहेत.
तसेच सिन्नर ची प्रतिभावान महिला क्रि केटपटू माया सोनवणे हिलाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.महाराष्ट्रा कडून २३ वयोगटात खेळताना ती इंडियातील सर्वाधिक२२ विकेट घेणारी खेळाडू ठरली.
नासिक क्रि केट अकॅडमीअंतर्गत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला १२ वर्षाचा साहिल पारख या खेळाडूने वयाच्या विविध गटाच्या५१सामन्यात २३७५ धावा , ११२विकेट आणि ३३झेलघेत अफलातून कामिगरी केली आहे.
बास्केट बॉल च्या राष्ट्रीय खेळाडू शुभांगी पाठकयांनी सूत्र संचालन केले, तर प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले.(02क्रि केट)