राजदेरवाडीला दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नाचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 04:27 PM2018-10-14T16:27:24+5:302018-10-14T16:28:57+5:30

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार मिळविले ते फक्त गावाच्या व गावकºयांच्या एकीमुळेच मिळाले असून पाणी फांऊडेशनचे श्रमदानाचे काम सुरु असतांना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था या गावात पहाटे सहा वाजता आले तेव्हा या गावकºयांनी भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले

Felicitated Water Resource To Help Redder On Rajderwadi | राजदेरवाडीला दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नाचा सत्कार 

राजदेरवाडीला दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नाचा सत्कार 

Next
ठळक मुद्दे भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले

चांदवड - चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीने पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत पहिला क्रमांक ,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा जिल्हयाचा दुसरा पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त अभियांनाचा विशेष पुरस्कार व स्मार्ट व्हिलेज असे अनेक पुरस्कार मिळविले ते फक्त गावाच्या व गावकºयांच्या एकीमुळेच मिळाले असून पाणी फांऊडेशनचे श्रमदानाचे काम सुरु असतांना भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था या गावात पहाटे सहा वाजता आले तेव्हा या गावकºयांनी भल्या पहाटे उपस्थिती दाखवून हातात पाट्या, फावडे घेऊन त्यांच्याबरोबर श्रमदान केले त्यामुळे चांदवड तालुका दुष्काळी असतांनासुध्दा येथील पाझरतलावाला आजही दुष्काळात पाणी आहे ते गावाच्या एकजुटीची व कामाची फलश्रृती असल्याचे प्रतिपादन चांदवड -देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांनी व्यक्त केले. तर बºयाच गावामध्ये दोन तट गट असतात हे मात्र या गावात दिसून येत नाही पाणी फाऊंडेशनचे काम सुरु असतांना बºयाच गावामध्ये जाणाºयाचा योग आला मात्र तेथील नागरीक व तरुण गावातील पारावर बसून असत मात्र त्यांनी श्रमदान केले नाही त्या उलट या गावाने एकी करुन रात्री पहाटे श्रमदान केल्याने हे काम उभे राहु शकले असेही अहेर म्हणाले.
राजदेरवाडी येथे विविध विकास कामाचे उदघाटन, भूमिपूजन व जलपूजन तसेच गाव दुष्काळमुक्त होण्यासाठी मदत करणाºया जलरत्नांचा सत्कार सोहळा आमदार डॉ राहुल अहेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे, पाणी फाउंडेशनचे हेमंत पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश देवरे,उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, विलास ढोमसे, तालुकाध्यक्ष सुनील शेलार, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, बाळासाहेब वाघ, सरपंच सखुबाई माळी, उपसरपंच मनोज शिंदे, भारतीय जैन संघटनेचे प्रमोद गोेळेचा, प्रशांत ठाकरे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साळुंके, वनअधिकारी संजय पवार,नांदुरटेकचे सरपंच प्रभाकर ठाकरे , सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता मोरे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. मनोहर यशवंते यांनी केले.आभार ग्रामसेवक बी.पी. सोनवणे यांनी मानले.स्वागत नंदराज जाधव, दीपक जाधव, सखुबाई माळी, जगन यशवंते, बापु अहेर, तानाजी शिंदे यांनी केले.तर अनेक जलरत्नांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकांत उपसरपंच मनोज शिंदे यांनी सांगीतले की,धरणाची खोली व माती बांध व इतर कामे केल्याने दुष्काळमुक्त राजदेरवाडी हे होऊ शकले तर आमदार डॉ.अहेर यांनी बरीच विकास कामे या गावाला दिल्याने आम्ही प्रत्येक पुरस्कार जिंकू शकलो . तर राजदेरवाडी किल्ला व परिसरात पर्यटनासाठी शासनाने मदत दिल्यास या आदिवासी गावाचा विकास होऊ शकतो असे शिंदे यांनी सांगीतले . तर आमदार डॉ. राहुल अहेर यांनी राजदेरवाडी किल्ला, कोळधर, इंद्रायणी किल्ला पर्यटन विकासासाठी १७ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून येथील नवयुवकांना याचा नक्कीच लाभ होईल असे ते म्हणाले तर पुर्वीच्या काळी फक्त दुधदुभते व खव्यासाठी प्रसिध्द असलेले राजदेरवाडी हे गाव आता कुठे या पाझरतलावामुळे शेती व उद्योगात प्रगती गाठत आहे. जलयुक्तची कामे झाल्यास राजदेरवाडी सारखे इतर गावांनी त्याचा आदर्श घ्यावा यासाठी लवकरच तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांची या गावाची पाहणी व मेळावा घ्यावा अशी सुचना त्यांनी केली यावेळी नंदराज जाधव, हेमंत पाटील, भुषण कासलीवाल,प्रांत सिध्दार्थ भंडारे, डॉ. नितीन गांगुर्डे यांची भाषणे झालीत.कार्यक्रमास विजय धाकराव, वर्धमान पांडे, ज्ञानेश्वर सपकाळे,योगेश ढोमसे, नंदु जोंधळे, साईनाथ कोल्हे, जगदीश कोल्हे, शरद पाटील, अण्णासाहेब शिंदे, नाना जाधव, सुरेश जाधव, भीका जाधव, जगन जाधव, विक्रम जाधव, बाळु जाधव, निवृत्ती जाधव आदिसह राजदेरवाडीचे ग्रामस्थ , अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Felicitated Water Resource To Help Redder On Rajderwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक