फुले विद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:48 AM2018-03-16T00:48:51+5:302018-03-16T00:48:51+5:30

सिन्नर : क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाचा वसा दिला. मुलींनी तो वसा घेत शिक्षणातून प्रगती साधावी, आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करीत आहेत. त्यामुळे घरात तसेच समाजात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केली.

Felicitated women in Flowers School | फुले विद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

फुले विद्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Next
ठळक मुद्देशीतल सांगळे : समाजात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

सिन्नर : क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाचा वसा दिला. मुलींनी तो वसा घेत शिक्षणातून प्रगती साधावी, आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करीत आहेत. त्यामुळे घरात तसेच समाजात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी व्यक्त केली.
येथील महात्मा फुले शैक्षणिक संकुलात वार्षिक पारितोषिक वितरण सभारंभ व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना सांगळे बोलत होत्या. सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंंद्रकांत वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, चित्रा लोंढे, मीनाक्षी झगडे, प्रीती वायचळे, वैशाली भगत, शिक्षण विस्तार अधिकारी राजीव लहामगे, विष्णुपंत बलक, संचालक सुनील गवळी, राजेंद्र आंबेकर, कैलास झगडे, दत्ता गोळेसर, योगेश पाचोरे, प्राचार्य वंदना साळुंके आदी उपस्थित होते.
मुलींची संख्या जास्त असल्याने समाधान वाटते. मुलींनी शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे, असे आवाहन करतानाच शैक्षणिक गरज लक्षात घेऊन संगणक कक्षाची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील, अशी ग्वाही सांगळे यांनी दिली.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक संकुलातील वर्षभरातील विविध स्पर्धा, परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य वंदना साळुंके यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील विद्यार्थी, माता, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र म यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
महात्मा फुले शैक्षणिक संकुलातून आजवर अनेक विद्यार्थी घडविले असून, विद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करून देशसेवा करीत आहेत, विद्यार्थिवर्ग तळागाळातील आहे आम्ही त्यांना घडवतो, असे प्रतिपादन वरंदळ यांनी केले. विद्यालयासाठी संगणक कक्षाची गरज असल्याचे त्यांनी सांगत सांगळे यांना संगणक कक्ष मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे घातले. यावेळी कैलास झगडे, राजेंद्र आंबेकर, सोनाली पवार आदींनी मार्गदर्शन केले.

Web Title: Felicitated women in Flowers School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.