द्राक्ष मंजूर महिलांचा सन्मान पत्र देऊन सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 07:11 PM2019-03-16T19:11:30+5:302019-03-16T19:14:27+5:30
पिंपळगाव बसवंत : कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या द्राक्ष कामगार महिलांचा मॉन्सून ग्रीन अर्थ आणि डी एम अॅग्रो एक्स्पोर्ट आॅरचिड पॅक हाऊस कोकणगावतर्फे महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर सत्कार करण्यात आला.
पिंपळगाव बसवंत : कोणावरही अवलंबून न राहता कष्ट करून स्वाभिमानाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या द्राक्ष कामगार महिलांचा मॉन्सून ग्रीन अर्थ आणि डी एम अॅग्रो एक्स्पोर्ट आॅरचिड पॅक हाऊस कोकणगावतर्फे महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर सत्कार करण्यात आला.
सगळ्या जगात महिला दिनाच्या अनुषंगाने निराधार द्राक्ष कामगार महिलांच्या सत्कार सोहळ्याळ्याचे आयोजन द डी.एम एग्रो द्राक्ष एक्स्पोर्ट कंपनीकडून करण्यात आले होते. यावेळी या द्राक्ष मजुरी करणाऱ्या महिलांचा नऊवारी पातळ, चोळी व पुष्पगुच्छ, सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये अनिता खालाटे, उर्मिला चौधरी, अनिता राऊत, आरती मनोधने, रेखा बोराडे, लता पवार, आरती बोराडे, प्रमिला राऊत, संगीता गावित आदींसह इतर महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्र माला अध्यक्ष ( एम.जी.इ) डायरेक्ट लक्ष्मण सावळकर, मॅनेजर योगेश मुंगशे, शिवाजी आजबे, रोहित शिवणकर आदी उपस्थित होते तर या कार्यक्र माचे आयोजन सिर्वस प्रोवायडर, दिलीप मोरे, रोहिदास गायकवाड, सुरज मोरे, विजय बोरस्ते आदीनी परिश्रम घेतले.
पिंपळगाव बसवंत महिला आधार संस्थाच्या वतीने बाबा मंगल कार्यालय येथे शुक्रवारी (दि.१५) कर्तृत्ववान समाजाला आदर्श देणाº्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला अध्यक्षरंजना मोरे, अॅड. जनार्र्दन देवरे, योगेश विधाते, माऊली उफाडे, संजय मोरे, दिलीप मोरे, उज्वला जाधव, शेलार आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.