मोर्चातील शेतकऱ्यांचा सुरगाण्यात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:15 AM2018-03-19T00:15:57+5:302018-03-19T00:15:57+5:30

सुरगाणा : एकजूट व ठाम निश्चय असला व शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला तर प्रश्न सुटू शकतात, हे लाल बावट्याने नाशिक ते मुंबई असा दूर अंतरावरच्या पायी निघालेल्या मोर्चाने दाखवून दिल्याचे प्रतिपादन माकपचे आमदार जे. पी. गावित यांनी केले. सुरगाणा येथे शनिवारी व्यापारी बांधवांनी मोर्चेधारकांचा सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

Felicitation of Farmers in the Front | मोर्चातील शेतकऱ्यांचा सुरगाण्यात सत्कार

मोर्चातील शेतकऱ्यांचा सुरगाण्यात सत्कार

Next
ठळक मुद्देमदतीचा ओघ सुरू राहिल्याने मोर्चेकरांचा उत्साह वाढला सर्वांचे पावलोपावली सहकार्य

सुरगाणा : एकजूट व ठाम निश्चय असला व शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला तर प्रश्न सुटू शकतात, हे लाल बावट्याने नाशिक ते मुंबई असा दूर अंतरावरच्या पायी निघालेल्या मोर्चाने दाखवून दिल्याचे प्रतिपादन माकपचे आमदार जे. पी. गावित यांनी केले. सुरगाणा येथे शनिवारी व्यापारी बांधवांनी मोर्चेधारकांचा सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी धर्मेंद्र पगारिया, उपनगराध्यक्ष सचिन अहेर, ईश्वर थोरात, विठ्ठल थोरात, प्रवीण दवंडे, उत्तम सौंदाणे, लक्ष्मण सोनवणे, भिका पठाण, दीपक थोरात, रमेश सोनवणे, आनंदराव चौधरी, सुनील सोनवणे, रवींद्र खैरनार आदी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार गावित म्हणाले, या मोर्चामुळे सुरगाण्याचे नाव महाराष्ट्र, देशातच नाही तर संपूर्ण जगात पोहचले. विदर्भ, सांगली, सातारा आदी अनेक ठिकाणहून फोन आले. कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असा निर्वाणीचा विचार करूनच मोर्चा काढला होता. शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटू शकतात हे या मोर्चाने दाखवून दिले. शेतकºयांनी घरूनच दोन दिवसाच्या भाकरी व पुढील दिवसांसाठीचा शिधा सोबत घेतला होता. नेते जयंत पाटील यांनी मोठी मदत करून ते मोर्चातही सहभागी झाले. मदतीचा ओघ सुरू राहिल्याने मोर्चेकरांचा उत्साह वाढला, असेही ते म्हणाले. मोर्चेकºयांचे पाय चटकत होते, रक्त निघत होते. तरीही हिंमत हारली नाही. रस्त्यात अनेकांची मदत झाली. एकनाथ शिंदे यांनीही मोलाचे सहकार्य केले. सरपंच असेल किंवा अन्य कोणी, त्या सर्वांचे पावलोपावली सहकार्य मिळाले. मुस्लीम, दलित संघटनांनीदेखील खाण्यापिण्याची व्यवस्था केली.

Web Title: Felicitation of Farmers in the Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.