सिन्नर वाचनालयात वाचकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:14 AM2018-04-24T00:14:05+5:302018-04-24T00:14:05+5:30
सिन्नर वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. युवा पिढीला वाचनाची प्रेरणा मिळावी, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने वाचनालयाच्या वतीने नियमित ११ वाचकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत यांनी मार्गदर्शन केले.
सिन्नर : सिन्नर वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. युवा पिढीला वाचनाची प्रेरणा मिळावी, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने वाचनालयाच्या वतीने नियमित ११ वाचकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा भगत यांनी मार्गदर्शन केले. समाजाला पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळण्यासाठी वाचनालयात गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे पुस्तके वाचन करणाऱ्या अकरा वाचकांचा पदाधिकाºयांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अण्णासाहेब खताळे, बाळकृष्ण शिंदे, संजय अहेर, रसिकलाल गुजराथी, सुनील चव्हाण, राजेंद्र अंकार, राजेश वाजे, दिनकर रुपवते, डॉ. प्रतिभा पाटील, माधुरी घोलप, शीतल म्हस्के यांना यावेळी गौरविण्यात आले. याप्रसंगी सुभाष हांडोरे यांनी मातोश्री कै. शेवंताबाई हांडोरे यांच्या स्मरणार्थ वाचनालयास पाच हजार रुपयांची पुस्तके भेट दिली. ग्रंथ भेट दिल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे कार्यवाहक हेमंत वाजे, उपाध्यक्ष पुंजाभाऊ सांगळे, संचालक पी. एल. देशपांडे, मनीष गुजराथी, विलास पाटील, जितेंद्र जगताप, संचालक निर्मला खिंवसरा, दत्तात्रय देशमुख आदींसह वाचक उपस्थित होते.