आपुलकी सेवाभावी ग्रुपतर्फे  आदर्श शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:25 AM2018-09-26T00:25:45+5:302018-09-26T00:26:06+5:30

शिक्षकांनी भावी पिढी घडविण्याचे काम करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात काहीतरी वेगळे करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये बालपणीच खिलाडूवृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रुपतर्फे आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.

Fellowship of ideal teachers by the affectionate service group | आपुलकी सेवाभावी ग्रुपतर्फे  आदर्श शिक्षकांचा सत्कार

आपुलकी सेवाभावी ग्रुपतर्फे  आदर्श शिक्षकांचा सत्कार

Next

नाशिक : शिक्षकांनी भावी पिढी घडविण्याचे काम करण्यासाठी प्रवाहाच्या विरोधात काहीतरी वेगळे करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये बालपणीच खिलाडूवृत्ती जोपासण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. आपुलकी बहुद्देशीय सेवाभावी ग्रुपतर्फे आयोजित आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.  पंचवटीतील तपोवनातील भारत सेवाश्रम संघाच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी माधवप्रकाश, स्वामी संतोषगिरी महाराज, स्वामी परिपूर्णानंद गिरी महाराज, सोनल दगडे, विलास मुनोत, गटशिक्षणाधिकारी एस. जी. निर्मळ, उपस्थित हाते. सूत्रसंचालन प्रा. केशव रायते यांनी केले. आभार विष्णूपंत हगवणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी आपुलकी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष खंडेराव डावरे, शांताराम गायकवाड, गौरव मुनोत, जयवंत राऊत, कविता डावरे, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते.
यांचा झाला गौरव
बाळासाहेब सोनवणे, बलराम माचरेकर, भगवान हिरकुड, धनराज सगणे, दीपक पोतदार, डॉ. अशोक येवले, गणेश गायकवाड, गोरखनाथ जाधव, गोरक्ष सोनवणे, हेमंत पाटील, लक्ष्मण चव्हाण, माणिक भालेराव, मनोहर आव्हाड, नसीर मणियार, रमेश सानवणे, डॉ. संदीप पाटील, श्रीकांत काटेलवार, विजय निर्मळ, व्यंकट कदम, करु णा मुनोत, प्रा. केशव रायते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सपत्निक प्रदान करण्यात आला. याचबरोबर बॅँकाक येथे धावण्याच्या स्पर्धेत यश मिळविणारी ताई बाह्मणे व दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळविणाऱ्या वर्षा चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याचबराबर विविध परीक्षांमध्ये यश मिळविणाºया प्रसाद देवकर, रसिका शिंदे, दीक्षा दरेकर, हृतिक उगले, नेहा जगदाळे, मयूर डांगरे, अंकित सोनार, वैशाली नाठे, तनिष्का जाधव, वैष्णवी गावंडे, प्रतीक्षा मराठे, सुनील सानप, आरती चौधरी, मंदाकिनी बोरसे या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Fellowship of ideal teachers by the affectionate service group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.