वाघेरेला दोन बिबट्यांच्या झुंजीत मादीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:47 PM2020-05-21T21:47:33+5:302020-05-21T23:31:08+5:30

नांदूरवैद्य/सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झटापटीत एक वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 A female dies in a fight between two leopards at Waghere | वाघेरेला दोन बिबट्यांच्या झुंजीत मादीचा मृत्यू

वाघेरेला दोन बिबट्यांच्या झुंजीत मादीचा मृत्यू

Next

नांदूरवैद्य/सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील वाघेरे येथे दोन बिबट्यांमध्ये झालेल्या झटापटीत एक वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघेरे येथील पाच आंबे या शेती परिसरात सकाळी शेतकरी तुकाराम भोर हे आपल्या शेतात जात असताना अचानक बांधावर मृत अवस्थेत पडलेल्या बिबट्याला पाहून भोर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या घाबरलेल्या अवस्थेत झालेल्या घटनेची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली आणि वनविभागालाही खबर दिली गेली. एक वर्ष वयाची बिबट्या मादी बरगडीपासून पोटापर्यंत फाटलेल्या अवस्थेत मृत आढळून आली. सदर वार्ता पसरताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी खूप मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती माजी सरपंच मोहन भोर यांनी वन विभागाला कळविली असता वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडल अधिकारी दत्तू ढोन्नर, वनपरिमंडल अधिकारी भाऊसाहेब राव, पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती तळपाडे, वनरक्षक गाडर, घाटेसाव, सुरेखा आव्हाड, वनमजूर ठोकळ, वाळू आवाली यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.
या पाहणीत बिबट्याच्या मानेला जखमा झालेल्या होत्या शिवाय त्याच्या तोंडामध्ये केस आढळून आल्याने दोन बिबट्यांची झुंज झाल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी काढला. मृत बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी घोटी येथे नेण्यात आले आहे.
--------------------------------
पिंजरा लावण्याची मागणी
वाघेरे येथील सदर परिसरात शेतवस्तीवर अनेक शेतकरी राहत असून, रात्री-बेरात्री त्यांची दैनंदिन कामासाठी ये-जा सुरू असते. याच पार्श्वभूमीवर या झालेल्या घटनेतील बिबट्या परिसरातच कुठेतरी संचार करत असल्याच्या शक्यतेने परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकºयांनी केली आहे. परिसरात काही शेतकरी दुग्धव्यवसाय तसेच शेळीपालन आदी व्यवसाय करीत असल्यामुळे शेतकºयांमध्ये बिबट्याच्या संचारामुळे दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

Web Title:  A female dies in a fight between two leopards at Waghere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक