बनावट कागदपत्रांद्वारे महिलेची फ सवणूक
By Admin | Published: June 14, 2014 11:03 PM2014-06-14T23:03:25+5:302014-06-15T00:28:59+5:30
नाशिक : मृत व्यक्तीच्या नावावरील प्लॉट खोटे कागदपत्र तयार करून नावावर करणाऱ्या चार आरोपींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
नाशिक : मृत व्यक्तीच्या नावावरील प्लॉट खोटे कागदपत्र तयार करून नावावर करणाऱ्या चार आरोपींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तिडके कॉलनी येथे राहणारे प्रकाश काशीनाथ पलोड (६०) यांची आई कौशल्याबाई यांच्या नावावर शहरात प्लॉट होता़ १९९१ साली त्यांच्या निधनानंतर सात वर्षांनी म्हणजेच १९९८ मध्ये संशयित माणिकचंद पलोड, योगेश चांडक, पुष्कर हिंगणे, दीक्षित व श्रीकृष्ण सोसायटीचे पदाधिकारी यांनी प्लॉटचे खोटे कागदपत्र तयार केले़ त्यावर कोणीतरी अंगठा लावून तो कौशल्याबाई यांचा आहे असे भासवून इंद्रायणी पलोड यांच्या नावे करून दिला, अशी फि र्याद प्रकाश काशीनाथ पलोड यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे़ या फि र्यादीवरून या संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)