महिला मतदार व महिला पोलीस उपनिरीक्षकाची फ्री स्टाईल
By admin | Published: October 16, 2014 12:18 AM2014-10-16T00:18:01+5:302014-10-16T19:01:08+5:30
महिला मतदार व महिला पोलीस उपनिरीक्षकाची फ्री स्टाईल
नाशिक : मतदान केंद्राजवळील २०० मीटर परिसरात दुचाकी उभी करण्यावरून वाद होऊन प्रशिक्षणार्थी महिला पोलीस उपनिरीक्षक व मतदार महिला यांच्यात बुधवारी दुपारी फ्री स्टाईल हाणामारी झाली़ या घटनेनंतर संबंधित महिला व तिच्या पतीला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूपाली दीपक अंजने (२७), दीपक मंगलदास अंजने (३२, दोघेही राहणार शंकर बाग, उदयनगर, गंगापूररोड) हे दांपत्य बुधवारी दुपारच्या सुमारास वाघ गुरुजी शाळेत मतदानासाठी आले़ ते आपली दुचाकी (एमएच १५, डीएच १२४७) लावत असताना तेथे गंगापूर पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक सरिता या ड्यूटीवर होत्या़
उपनिरीक्षक सरिता यांनी रूपाली अंजने यांना मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात दुचाकी लावण्यास मज्जाव केला़ त्यावेळी रूपाली अंजने यांनी हुज्जत घालून त्यांना मारहाण केल्याचे जाधव यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ दरम्यान, गंगापूर पोलिसांनी अंजने दांपत्याला अटक केली आहे़ (प्रतिनिधी)