संतप्त महिलांचा व्हॉल्वमनला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:57 PM2019-06-02T23:57:46+5:302019-06-03T00:09:53+5:30
वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या सदिच्छानगर परिसरात पुन्हा अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या सदिच्छानगर परिसरात पुन्हा अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा कोणतीही दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्यास घेराव घातला.
सदिच्छानगर परिसरात सुमारे हजार लोकांची वस्ती आहे. नोकरदार व कामगारांची वस्ती म्हणून तिची ओळख आहे. या ठिकाणी गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी महिलावर्गाकडून भरले जात नसल्याने वापराचे पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्याला घेराव घालून जोपर्यंत अधिकारीवर्ग येऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत न सोडण्याचा निर्णय घेतला होता. अखेर अधिकाऱ्यांनी मोबाइल स्विच आॅफ केल्याने व्हॉल्वला सोडून देण्यात आले.
यावेळी नीलेश साळुंखे, बाळासाहेब काळे, अशोक ठाकरे, नितीन पाटील, धनराज गायकवाड , सुगंधा भोये, साखरबाई त्रिभुवन, नंदा गायकवाड, सुरेखा महाले, प्रतिभा पाटील, अरु णा अवतारे, वंदना दवते, ललिता पितलेवर, सविता लोंढे, आशा उदमले, मंगल उदमले , सरला निकम, मेघा भोये, सरस्वती मोरे, रेणुका गाडेकर, सविता क्षीरसागर, कलावती मोरे, रेखा बोरसे, सुनंदा भोळे, उषा गुंजाळ, रेणुका गाडेकर, जयश्री गावडे, विमल बोरसे, राणी डाखुरे, योगीता गावडे, वंदना काळे, मीना गुंजाळ, मनीषा वाघ, सुनीता क्षीरसागर, सुलोचना पाटील, सुवर्णा पाटील, पार्वती सावंत आदींसह इंदिरानगर परिसरातील महिला उपस्थित होत्या.
पाण्यासाठी महिलांची पायपीट
दिवसागणिक वाढणाºया उष्णतेच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात परिसरातील महिला वर्गासह बालगोपाळ पायपीट करत उन्हाचा तडाखा सहन करत आव्हाड मळ्याच्या विहिरीतून पाणी भरत आहेत. अनेक वेळेस पाणीपुरवठा विभागात तक्रार करूनसुद्धा दखल घेतली जात नसल्याने रविवारी (दि.२) दुपारी पावणेचारच्या सुमारास व्हॉल्वमन पाणी सोडण्यास आला असता परिसरातील संतप्त महिलांनी त्याला घेराव घातला़