मेथी ६१ रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:13 AM2018-06-11T01:13:56+5:302018-06-11T01:13:56+5:30
पंचवटी: गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्र ीसाठी येणाऱ्या मेथी भाजीची आवक घटत चालल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. मागील आठवडाभरापासून मेथी जुडीचे दर टिकून असल्याने मेथी उत्पादन करणाºया शेतकºयांनी योग्य बाजारभाव मिळत असल्याने समाधान व्यक्त केले आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी ६१ रुपये प्रति जुडी दराने विक्र ी झाली.

रविवारी (दि.१०) बाजारसमितीत केवळ १५ ते २० टक्के मेथी भाजीची आवक आल्याने बाजारभाव कडाडल्याचे भाजीपाला व्यापाºयांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मेथीच्या प्रति जुडीला कधी ४० तर कधी ५० रुपये असा बाजारभाव मिळत आहे. रविवारी कमी आवक आल्याने मेथी ६१०० रुपये शेकडा दराने विक्र ी झाली. यंदाच्या वर्षातील ६१ रुपये असा उच्चांकी बाजारभाव मेथी जुडीला मिळाला आहे.