शेणखत मिळणे झाले दुरापास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 07:22 PM2018-10-31T19:22:29+5:302018-10-31T19:25:16+5:30

खामखेडा : ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस पशुधन घटत असल्यामुळे शेणखताची कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी पर्याय म्हणून मेंढीच्या लेंडी खताला महत्व येवू लागले आहे.

Fenugreek is found in misery | शेणखत मिळणे झाले दुरापास्त

शेणखत मिळणे झाले दुरापास्त

Next
ठळक मुद्देशेणखत कमी झाले व आता लेंडी खतावर अवलंबून राहवे लागत आहे.

खामखेडा : ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस पशुधन घटत असल्यामुळे शेणखताची कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी पर्याय म्हणून मेंढीच्या लेंडी खताला महत्व येवू लागले आहे.
पूर्वी बहुतांशी शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी, बैल, शेळया मेंढया मोठ्या प्रमाणात असायच्या, त्यांना चारण्यासाठी मोकळे रान आणि मुबलक चारा उपलब्ध होत असे, पाऊसही भरपूर पडत होता, त्यामुळे शेतीसाठी शेणखत भरपूर मिळायचे, परंतु मोठ्या प्रमाणात बागायती शेती झाल्याने व शेतीसाठी अन्य आधुनिक यंत्र उपलब्ध झाल्याने पशुधन कमी झाले.
शेती यांत्रिक पद्धतीने केली जाऊ लागल्याने बैलाची संख्या कमी झाली. आता थोड्या शेतकºयांकडे बैल अत्सित्वात आहेत. त्यामुळे शेणखत कमी झाले व आता लेंडी खतावर अवलंबून राहवे लागत आहे.
खामखेडा परिसरामधे पूर्वी मोठया प्रमाणात धनगर समाजाचे माणसे शेतीला पूरक व्यवसाय म्हणुन मेंढीपालन व्यवसाय करत असत, त्यामुळे मेंढयाचे कळप मोठया प्रमाणात शेतांमध्ये वाड यासह रहात असे त्याचा मोबदला म्हणुन धान्य किंवा पैसा दिला जायचा. त्याचावर मेंढपाळांचा प्रपंच चालत असे. त्याकाळी जिरायती शेती मोठया प्रमाणात होती त्यामुळे मेंढयाना चरण्यासाठी मुबलक जंगल उपलब्ध व्हायचे, आता जिरायती शेती बागायती झाली. मेंढयांना चरण्यासाठी मोकळे रान नसल्यामुळे खामखेडा परिसरातील मेंढपाळ व्यवसाय ही कमी होत चालला आहे. गावात पाचदहा लोकांकडे मेंढीपालन व्यवसाय केला जात आहे. म्हणूनच आता बाहेर गावातून येण्याºया मेंढपालकांवर अवलंबून रहावे लागत आहे.
खरिप हंगाम संपल्यावर माळमाथा परिसरातील मेंढपाळ म्ेंंढ्यांच्या वाड्यासह आठ महिन्याच्या भटकंतीसाठी घर सोडतो. त्यावेळेस शेतीत कांदा काढण्याचा हंगामा सुरुअसतो. त्यामुळे मेंढ्यांना चरण्यासाठी शेतातील गवत चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असे, आणि चाºयाच्या बदल्यात विनामूल्य मेंढया बसविल्या जातात आणि ज्या शेतकºयांकडे शेतात चारा नाही असे शेतकरी या मेंढपाळाना मोबदला म्हणुन धान्य किंवा पैसे देत आहेत. त्याकरीता धनगराच्या वाड्यावर संपर्क ठेवावा लागतो. या मेंढयाच्या मलमूत्र शेतात पडल्यामुळे जमिनीची पोत सुधारुन उत्पादनात वाढ होते.
परंतु आता दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने सर्वत्र चाराटंचाई निर्माण होत असल्याने पर्यायाने पशूधन घटत चालल्याने दूभती आणि पाळीव जनावरे कमी झाल्यामुळे शेणखत शेतकºयांकडे जमा होत नाही.

मेंढपाळ तरुण या व्यवसायापासून दूर.....
आता हा मेंढपाळ व्यवसायात तरुण पिढीत येण्यास तयार नाहीत. त्यांना ऊन्हात, पावसात अधिकश्रम दिवसभर मेंढयांमागे फिरणे यात त्यांना रस नसून शिक्षण करुन चांगल्या पगाराची नोकरी, व्यवसाय, किंवा उत्तम शेती करण्याची मुलाची इच्छा आहे असल्याचे त्यांच्या पालकांकडून सांगण्यात आले.

Web Title: Fenugreek is found in misery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी