नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथी, कोथिंबीर १ रुपया जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:30 AM2018-02-09T01:30:00+5:302018-02-09T01:30:16+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि.८) कोथिंबीर, मेथी भाजीची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (दि.८) कोथिंबीर, मेथी भाजीची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात कोथिंबीर पाठोपाठ मेथी जुडी १ रुपया दराने विक्र ी झाली. अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने काही नाराज शेतकºयांनी बाजार समितीत कोथिंबीर फेकली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतमालाची आवक वाढली आहे. मेथी, कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे. गुरुवारी सायंकाळी झालेल्या लिलावात मेथी तसेच कोथिंबीर १ रुपया प्रतिजुडी (शेकडा १००) रुपये असा नीचांकी बाजारभाव शेतकºयांनी आणलेल्या शेतमालाला मिळाला. लागवड व दळणवळणासाठी खर्च केलेली रक्कम हाती न पडल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर काही नाराज शेतकºयांनी कोथिंबीरचे काही वक्कल बाजार समितीतच सोडून देणे पसंद केले. गेल्या सोमवारपासून ढगाळ हवामान असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.