मेथी ५.५०, तर कांदापात ३४ रुपये जुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:02+5:302020-12-07T04:10:02+5:30

चौकट ----- वांगी उतरली मागील दोन सप्ताहांपर्यंत वांग्याला चांगला दर मिळत होता. या सप्ताहात वांग्याचे दर उतरले असून, बटाटा ...

Fenugreek at Rs 5.50 and onion at Rs 34 | मेथी ५.५०, तर कांदापात ३४ रुपये जुडी

मेथी ५.५०, तर कांदापात ३४ रुपये जुडी

Next

चौकट -----

वांगी उतरली

मागील दोन सप्ताहांपर्यंत वांग्याला चांगला दर मिळत होता. या सप्ताहात वांग्याचे दर उतरले असून, बटाटा मात्र तेजीत आहे. पालकाची जुडी, तर मातीमोल भावाने विकली जात असून, घाऊक बाजारातील सरासरी अडीच रुपये जुडीचा दर आहे.

चौकट -

स्ट्रॅाबेरीचे आगमन

फळबाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन झाले असून, किरकोळ बाजारात साधारणत: ६० रुपये किलो दर आहे. काही फळविक्रेत्यांकडे आंब्याचेही आगमन झाले असून, २०० ते २८० रुपये किलोचा दर त्याला मिळत आहे.

चौकट -

किराणा बाजारात शांतता

नवीन पीक बाजारात आल्याने किराणा बाजारात फारशी उलाढाल झालेली नाही. यामुळे सर्व डाळींसह तेलाचे भाव या सप्ताहात स्थिर राहिलेत. दिवाळीपूर्वी किराणा बाजारात अचानकपणे आलेली तेजी आता कमी होऊ लागली आहे.

कोट -

सध्या खाद्यतेलाचे भाव डब्याला १९०० रुपयांपर्यंत गेले आहेत. मार्चपर्यंत खाद्यतेलांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता असून, डब्याचे भाव दोन हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- अनिल बूब, किराणा व्यापारी

कोट -

कांद्याचे भाव उतरत असतानाच पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही भाव उतरल्याने या मालावर होणार खर्चही वाया गेला असून, शेतकऱ्यांनी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. बदलत्या हवामानाचाही भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे.

- अशोक दौंडे, शेतकरी

कोट -

दिवाळीनंतर किराणामालामध्ये फारशी वाढ झाली नसल्याने दिलासा मिळत आहे. घाऊक बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असला तरी किरकोळ विक्रेतेमात्र आमच्याकडून अधिक पैसे घेतात. त्यामुळे स्वस्त भाजीपाल्याचा लाभ मिळत नाही.

- शोभना निकम, गृहिणी

Web Title: Fenugreek at Rs 5.50 and onion at Rs 34

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.