‘फर्ग्युसन’ने जिंकला गोसावी काव्य करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:50 AM2019-01-12T00:50:56+5:302019-01-12T00:51:20+5:30
बीवायके महाविद्यालयात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्य स्पर्धेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने सर डॉ. मो.स. गोसावी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्य करंडक पटकवला आहे.
नाशिक : बीवायके महाविद्यालयात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्य स्पर्धेत पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाने सर डॉ. मो.स. गोसावी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्य करंडक पटकवला आहे.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचीव डॉ. मो. स.गोसावी यांच्या हस्ते या काव्य स्पर्धांचे उद्घाटन झाले. तर बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांच्यासह प्रमुख पाहूणे नंदन राहणे, मानसी देशमुख, सोमनाथ पगार, व नरेश महाजन यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यात केटीएचएमचा प्रवीण सोमासेला सर्वोत्कृष्ट कवी पारितोषिक देण्यात आले. तर सामाजिक कविता प्रकारात शंकर शिंदे, नितीन जाधव, शेखर बोरसे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले.तर विनोदी काव्य प्रकारात सर्वेश साबळे (बीवायके), सचीन चव्हाण व मनीषा आवारी (व्ही.एन.नाईक महाविद्यालय) यांना पारितोषिके मिळाली, निसर्ग काव्य प्रकारात विलास पंचभाई (एचपीटी महाविद्यालय) ऋचा पाठक (गोसावी महाविद्यालय) व सिद्धी भावसार व प्रेम काव्य प्रकारात केटीएचएम महाविद्यालयाचे प्रवीण सोमासे व गणेश सोनवणे यांच्यासह विजेत्यांचा सत्कार झाला.