सटाणा शहरातील फेरीवाल्यांच आॅनलाईन सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 03:58 PM2019-06-05T15:58:08+5:302019-06-05T15:58:30+5:30
सटाणा:येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल आॅनलाईन सर्वेक्षण आता होणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आली.
सटाणा शहरातील फेरीवाल्यांच आॅनलाईन सर्वेक्षण
सटाणा:येथील पालिका हद्दीतील स्थिर, फिरते व तात्पुरते फेरीवाले यांचे मोबाईल आॅनलाईन सर्वेक्षण आता होणार आहे. या विशेष उपक्र माचा प्रारंभ पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता हिये-डगळे यांच्या हस्ते करण्यात आली.
सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सटाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील पथ विक्र ेता मोबाईलद्वारे आॅनलाइन सर्वेक्षण केले जाणार आहे. याकरिता पालिका हद्दीतील असा व्यवसाय करणार्या परवानाधारक व विनापरवानाधारक फेरीवाले व्यवसायिकांनी आपले आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते पुस्तक, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच आदिवासी, विधवा असलेल्यांनी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र, अनुसूचित जाती-जमाती इत्यादीमध्ये समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, व्यवसाय धारक व व्यवसायाचा फोटो आदि कागदपत्रांच्या प्रती मोबाईल ?पमध्ये सर्वेक्षण करताना जवळ ठेवाव्यात,असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सेवादल नागरी सेवा सहकारी संस्था मर्यादित ठाणे या बाह्य संसाधन संस्थेकडून सर्व सर्वेक्षण पूर्ण करून प्रत्येक पथविक्र ेत्यास ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.विक्र ेत्यांनी या सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी हेमलता हिले-डगळे यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष महेश देवरे, महिला व बालकल्याण सभापती भारती सूर्यवंशी, बांधकाम अभियंता चेतन विसपुते, नगर रचनाकार धनंजय अिहरे, बाजार वसुली प्रमुख विजय देवरे, अजय पवार आदी उपस्थित होते.